पिंपरी - वर्षानुवर्षे मिळकतकर थकबाकी ठेवणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्याअंतर्गत विविध योजना, धोरणे, निर्णय घेऊन अधिकाधिक थकबाकी वसुलीचा प्रयत्न केला जात आहे. पूर्वसूचना देणे, जप्ती करणे, प्रसंगी जप्त मालमत्तांचा लिलाव करणे, असे नियोजन केले आहे. शिवाय, ३० जूनपर्यंत थकबाकीसह संपूर्ण कराची रक्कम भरल्यास विविध सवलत योजनाही जाहीर केल्या आहेत.
मिळकतकर वसुलीसाठी एसएमएस व कॉलिंगद्वारे आवाहन केले जात आहे. त्यानंतरही थकबाकी न भरल्यास जप्तीची कारवाई केली जाणार आहे. गेल्या जप्त केलेल्या मालमत्तांचा लिलाव केला जाणार आहे. वर्षानुवर्षे थकीत कर वसुलीसाठी महापालिका करसंकलन व करआकारणी विभाग प्रयत्न करीत आहे. या वर्षी एक हजार कोटी रुपये मिळकतकर वसुलीचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी सिद्धी प्रकल्पाअंतर्गत शंभर टक्के मिळकतकर बिलांचे वाटप घरोघरी केले आहे. त्याअंतर्गत एक लाखांपेक्षा जास्त थकबाकीदारांना, २२ हजार मिळकतधारकांना जप्ती पूर्व नोटीस दिल्या आहेत.
५० हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम थकबाकीदार
- थकबाकीदार मिळकतधारक - ३९ हजार ६५५
- थकबाकीची एकूण रक्कम - ६४७ कोटी ६२ लाख ४० हजार
- थकबाकी भरलेल्या मिळकती - ३ हजार ६
- थकबाकी भरलेली रक्कम - २३ कोटी २९ लाख
३० जूनपर्यंत सामान्य करात सवलत
- मिळकतकर रक्कम आगाऊ भरल्यास - ५ टक्के
- ‘ऑनलाइन’ करभरणा केल्यास - ५ टक्के
- महिला मिळकतधारक असल्यास - ३० टक्के
- दिव्यांग मिळकतधारकांसाठी - ५० टक्के
- माजी सैनिक मिळकतकरधारक - १०० टक्के
- एसटीपी व कम्पोस्टिंग यंत्रणा असल्यास - ५ टक्के
- झिरो वेस्ट व एसटीपी प्लांट असल्यास - १० टक्के
‘गतवर्षी सुमारे दोन हजार मिळकती जप्त वा सील केल्या आहेत. त्यातील काही मिळकतधारकांनी थकबाकी भरली आहे. ती न भरलेल्या निवासी, बिगर निवासी आणि औद्योगिक अशा १०० मालमत्तांची लिलाव प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.’
- शेखर सिंह, प्रशासक, महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.