पिंपरी-चिंचवड

छोट्या व्यावसायिकांच्या अडचणींमध्ये वाढ

CD

सोमाटणे, ता. ३ ः पर्यटन स्थळालगतच्या टपऱ्या हटविण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेमुळे टपरीवजा बांधकाम केलेल्या छोट्या व्यवसायिकांच्या अडचणी वाढल्या आहेत.
पुणे, पिंपरी-चिंचवड, हिंजवडीसह आयटी पार्कमधील नोकरदारांना जवळचे पर्यटनस्थळ म्हणून कासारसाई धरणाला पसंती दर्शविल्याने या ठिकाणाला अधिक महत्त्व आले. परिणामी, गेल्या एक दशकापासून येथे वर्षभर सुट्टीच्या दिवशी धरण पर्यटकांनी हाऊसफुल्ल होते. येथील पर्यटकांच्या गर्दीचा विचार करून स्थानिकांनी धरण परिसरात
रस्त्यालगत शेतीला जोडधंदा म्हणून टपऱ्यावजा बांधकाम करून यात मक्याची भाजलेली कणसे, भुईमुगाच्या भाजलेल्या शेंगा, वडापाव, मिसळ, भजी, नाष्टा, जेवण आदींचे छोटे व्यवसाय उभारले आहेत. काहींनी छोटे हॉटेल, खानावळी सुरू केल्या. यावर ते आपली उपजीविका भागवत आले आहेत. परंतु लोणावळा येथील पर्यटक दुर्घटनेच्या घटनेनंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने पर्यटनस्थळालगतच्या सुरक्षिततेसाठी त्रासदायक ठरणाऱ्या अनधिकृत टपऱ्या हटविण्याच्या सूचना आल्याने छोट्या व्यवसायिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. आपल्या व्यवसायाचे काय होईल? ही भीती त्यांना वाटू लागली आहे. व्यवसाय बंद झाल्यानंतर पर्यटकांचा ओढा मोठ्या हॉटेलकडे जाणार असून, त्यांचा व्यवसाय वाढणार तर आमच्या पोटाचे काय? हा प्रश्न छोट्या व्यावसायिकांचा आहे. व्यावसायिक बाळासाहेब केदारी म्हणाले, स्थानिक भूमिपुत्रांना त्यांच्या उपजीविकेसाठी नव्याने पर्यटनपूरक व्यवसायासाठी शासनाने मदत करावी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT