पिंपरी-चिंचवड

महिलेच्या पोटातून काढला कापसाचा बोळा वायसीएम रुग्णालयात किचकट शस्त्रक्रिया यशस्वी, प्रकृतीत सुधारणा

CD

पिंपरी, ता. ४ ः सिझेरियन करताना डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे पोटात राहिलेला कापसाचा बोळा शस्त्रक्रियेद्वारे काढून डॉक्टरांनी महिलेला जीवनदान दिले आहे. अत्यंत किचकट अशी ही शस्त्रक्रिया पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात जूनमध्ये पार पडली. सध्या या महिलेची प्रकृती उत्तम असल्याने तिला घरी सोडले जाणार आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.
एका तीस वर्षीय महिलेचे बाळ पोटातच मृत पावल्याने ते बाळ बाहेर काढण्यासाठी तिच्यावर हैदराबाद येथील खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया करताना महिलेच्या पोटात डॉक्टरांच्या चुकीमुळे कापसाचा बोळा (मॉब) राहिला. ही शस्त्रक्रिया २२ मे रोजी पार पडली. मात्र, शस्त्रक्रियेनंतरही पोटात दुखायला लागल्यानंतर महिलेच्या कुटुंबीयांनी तिला पिंपरी चिंचवड येथे आणले. आकुर्डी येथील खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी तिच्यावर औषधोपचार केले. मात्र, तरीही तिला उलटी, पोटदुखी, ताप याचा त्रास होत होता. त्यामुळे तिचे सी.टी स्कॅन करण्यात आले. त्यामध्ये तिच्या पोटात वस्तू असल्याचे आढळून आले. त्यानुसार खासगी डॉक्टरांनी तिला शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. मात्र, खासगी रुग्णालयातील खर्च परवडणार नसल्याने तिला पुढील उपचारासाठी २२ जून रोजी वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. सीटी स्कॅन व एमआरआय या तपासण्या करण्यात आल्या. लगेचच तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेमध्ये ३० बाय ३० सेंटीमीटरचा कापसाचा बोळा महिलेच्या पोटातून काढण्यात आला. लहान आतड्याच्या खाली व गर्भाशयाच्या वर असणाऱ्या या मॉबमुळे महिलेच्या पोटात संसर्ग होऊन लहान आतड्यांना छिद्र पडली होती. तसेच या अवयवांना रक्तपुरवठाही नीट होत नव्हता. त्यामुळे ही शस्त्रक्रिया अत्यंत किचकट अशी बनली होती. मात्र, डॉ. संतोष थोरात व डॉ. अक्षय म्हसे यांच्यासह वायसीएम रुग्णालयातील इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी आपले कसब पणाला लावून ही शस्त्रक्रिया यशस्वी केली.

‘‘महिनाभरापूर्वीच या महिलेचे सिझेरियन झाले होते. शस्त्रक्रियेची जखम भरली गेली नव्हती, या महिलेचा पल्सरेटही वाढला होता. त्यामुळे पुन्हा शस्‍त्रक्रिया करताना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागली. तब्बल साडेतीन तास चाललेल्या या शस्त्रक्रियेनंतर या महिलेला दहा दिवस रुग्णालयात ठेवण्यात आले. सध्या तिची प्रकृती उत्तम असून, तिला लवकरच घरी सोडण्यात येईल.’
ः- डॉ. संतोष थोरात, सर्जन व सहयोगी प्राध्यापक, वायसीएम रुग्णालय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT