पिंपरी-चिंचवड

आयुक्तांच्या नामफलकावर झळकले आईचेही नाव

CD

पिंपरी, ता. ५ ः शासकीय दस्ताऐवजांवर उमेदवाराच्या नावापुढे आईचे नाव लिहिणे आणि महापालिकेतील सर्व प्रशासकीय कामकाज मराठी भाषेतून करणे या दोन्ही शासन निर्णयांची अंमलबजावणी महापालिकेने सुरू केली आहे. त्यानुसार आयुक्त शेखर सिंह यांच्या नामफलकासह इतर अधिकाऱ्यांच्या नामफलकांवर त्यांच्या आईच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे.
आयुक्त सिंह यांच्या दालनाबाहेरील नामफलक आता ‘शेखर अनीता चंद्रहास सिंह’ असा केला आहे. इतर अधिकाऱ्यांच्याही दालनाबाहेरील नामफलक बदलण्यात येत आहेत. दरम्यान, महिलांना पुरुषांबरोबर समानतेची वागणूक देण्यासाठी, समाजामध्ये महिलांप्रती सन्मानाची भावना निर्माण करण्यासाठी, तसेच एकल पालक महिला यांची संतती (अनौरस संतती) यांना देखील समाजामध्ये ताठ मानाने जगता यावे, यासाठी शासकीय दस्ताऐवजांवर उमेदवाराचे नाव, आईचे नाव नंतर वडिलांचे नाव व आडनाव अशा स्वरूपात नाव नोंदविणे सरकारच्या निर्णयानुसार बंधनकारक आहे. तसेच, महापालिका कामकाज आणि व्यवहारामध्ये मराठी भाषेचा वापरही सुरू केला आहे.

फोटोः 30599

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT