पिंपरी-चिंचवड

विद्यार्थी आधार अपडेटप्रश्‍नी वेतन न थांबवण्याची मागणी

CD

पिंपरी, ता. ६ ः संच मान्यतेसाठी विद्यार्थ्यांचे आधार अपडेट करणे आवश्यक आहे. ते न केल्यास नव्याने टप्पा अनुदानावर येणाऱ्या शाळा, महाविद्यालयांना वेतन अनुदानाला मुकावे लागणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. परंतु, आधार अपडेट करताना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने त्यासाठी वेतन थांबवू नये, अशी मागणी शिक्षक व मुख्याध्यापकांकडून करण्यात आली आहे.
राज्य शासनातर्फे २०, ४०, ६० टक्के टप्पा अनुदानावर आलेल्या शाळांच्या संच मान्यतेची प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. नव्याने २० टक्के टप्पा अनुदानावर आलेल्या शाळांमधील शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या वेतनासाठी विद्यार्थी आधार अपडेटची अट घातली आहे. सध्या २०२३-२४ ची संच मान्यता पेंडिंग आहे. दिलेल्‍या मुदतीत विद्यार्थ्यांचे आधार अपडेट झाले नाही तर वेतन अनुदान थांबवले जाईल, अशी शिक्षण विभागाने भूमिका घेतली.

‘‘अनेक वर्षांपासून वेतनाच्या प्रतीक्षेत असलेल्या शिक्षकांना टप्पा अनुदान मिळण्यास सुरवात होणार आहे. तसेच संबंधित शिक्षकांना अतिरिक्त ठरवणे योग्य नाही. आधार अपडेट करण्यास शिक्षण विभागाने मुदतवाढ द्यावी. शिक्षकांचे वेतन थांबवू नये.’’
- हिंदुराव जाधव, अध्यक्ष, पश्‍चिम महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ

‘‘२०, ४०, ६० टक्के टप्पा अनुदानावर आलेल्या शाळांमधील शिक्षकांचे वेतन थांबवणे अवघड आहे. विद्यार्थ्यांचे आधार अपडेट करणे आवश्‍यक आहे. पण ते करण्यासाठी शिक्षकांना मर्यादा येत आहेत.’’
-महेंद्र गणपुले, प्रवक्ता, मुख्‍याध्यापक संघ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT