पिंपरी-चिंचवड

वेगवेगळ्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू हिंजवडी, बाणेर येथील घटना

CD

पिंपरी, ता. ६ : हिंजवडी व बाणेर येथे झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला. याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिंजवडीतील लक्ष्मी चौक येथे झालेल्या अपघातात करण कालिदास जाधव (वय २३, रा. हिंजवडी गावठाण) या तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी त्यांची बहीण क्रांती कालिदास जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अज्ञात टँकर चालकावर गुन्हा दाखल झाला आहे. करण हे त्यांची बहीण क्रांती यांना मारुंजी येथील कंपनीत सोडण्यासाठी दुचाकीवरून जात होते. दरम्यान, लक्ष्मी चौकात सिग्नल लागल्याने ते लेनच्या उजव्या बाजूला थांबले होते. दरम्यान, समोरून भरधाव आलेल्या दुचाकी चालकाने करण यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. यामुळे करण व त्यांची बहीण रस्त्याच्या डाव्या बाजूला पडले. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या पाण्याच्या टँकरचे चाक करण यांच्या पोटावरून गेल्याने गंभीर जखमी होऊन करण यांचा मृत्यू झाला.
तर, बाणेर येथे मुंबई -बंगळुरू महामार्गावर झालेल्या अपघातात विजयकुमार किशन कांबळे (वय २९, रा. खराळवाडी, पिंपरी) या तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी त्यांचे वडील किशन रामा कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल झाला आहे. विजयकुमार हे कोथरूड येथून घरी येत असताना अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीस पाठीमागून जोरात धडक दिली. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
----------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT