पिंपरी-चिंचवड

धोकादायक खड्डा त्वरित बुजवा

CD

तळेगाव दाभाडे (स्टेशन), ता. ९ : येथील मारुती मंदिर चौकाच्या उताराच्या वळणावर असलेल्या भूमिगत सांडपाणी वाहिनीच्या दुरुस्तीसाठी खोदाई केलेला खड्डा दोन महिने उलटूनही अद्याप धोकादायक स्थितीत आहे. हा खड्डा त्वरित बुजविण्यात यावा, अशी मागणी वाहनचालक व नागरिकांनी केली आहे.
भूमिगत सांडपाणी वाहिनी तुंबल्याने दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर पसरत आहे. या दोन फूट खोलीच्या खड्ड्यातून लोखंडी सळ्या बाहेर आल्याने रात्रीच्या वेळी दुचाकीस्वार खड्ड्यात पडल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. पाऊस पडत असल्याने खड्ड्यात पाणी साचले आहे. खड्ड्याच्या दुरुस्तीबाबत नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाला आधीच हौस त्यात पडला पाऊस असे म्हणण्याची वेळ आली आहे. सध्या पाऊस पडत असल्याने रस्ता निसरडा झाल्याने वळणावर दुचाकीस्वार घसरून पडण्याच्या घटना घडत आहेत. येथील सांडपाणी वाहिनीच्या दुरुस्तीसंदर्भात ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. मात्र, नगरपरिषद प्रशासनाने या गंभीर समस्येकडे डोळेझाक केली असून, नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. नागरिकांना नाहक त्रास सोसावा लागत आहे. नगरपरिषद प्रशासन येथे मोठी दुर्घटना घडण्याची वाट पाहत आहे का? असा संतापजनक प्रश्न नागरिक विचारत आहेत.

‘‘येत्या दोन-तीन दिवसांत मारुती मंदिर चौकाच्या वळणावर तुंबलेल्या भूमिगत सांडपाणी वाहिनीची दुरुस्ती करून नवीन पाइपलाइन टाकणार आहे.’’
- मल्लिकार्जुन बनसोडे, बांधकाम अभियंता, तळेगाव दाभाडे नगरपरिषद

‘‘माझ्या चहा-बिस्किटच्या दुकानासमोरच तुंबलेल्या गटाराची दुर्गंधी पसरल्याने ग्राहक येत नाहीत. नगरपरिषदेत मी आठ वेळा तक्रार केली. उद्या येतो, असे सांगून चालढकलपना करतात.’’
- अजय फावडे, चहा दुकानदार

PNE24U31229

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT