पिंपरी-चिंचवड

पिंपरी विठाई लेख गोसावी

CD

महावैष्णव कठीण
सोपानकाका

संत ज्ञानेश्‍वर महाराज यांनी त्यांच्या एका अभंगांमधून सोपानकाका यांचे वर्णन ‘महावैष्णव कठीण’ असे केले आहे. त्यावरून संत सोपानकाका यांच्या सामर्थ्याची व आध्यात्मिक उंचीची ओळख होऊ शकते. श्रीगुरू निवृत्तीनाथ महाराज व संत ज्ञानेश्‍वर महाराज यांना त्यांनी गुरुस्थानी मानले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सोपानकाका यांनी ‘सोपानदेवी’ हा ग्रंथ आपल्याला दिला. जी भगवत गीतेवरील त्यांची समश्लोकी टीका आहे.
- त्रिगुण महाराज गोसावी, सोहळाप्रमुख, संत सोपानदेव महाराज संस्थान

श्री संत सोपानदेव हे संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज व विश्र्वगुरू श्री निवृत्तीनाथ महाराज यांचे कनिष्ठ बंधू. तेराव्या शतकातील श्रेष्ठ संत सोपानदेव यांना वारकरी संप्रदायामध्ये ‘सोपानकाका’ या नावाने ओळखले जाते. सोपानदेव महाराज यांनी त्यांच्या अभंग गाथेद्वारे समाजाला मार्गदर्शन केले आहे. संत ज्ञानेश्‍वर यांच्या संजीवन समाधीनंतर एक महिन्याने संत सोपानकाका यांनी श्रीक्षेत्र सासवड येथे संजीवन समाधी घेतली. त्या ठिकाणी त्यांचे संजीवन समाधी मंदिर उभे आहे.

शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा
संत सोपानकाका यांच्या आषाढ वारीची परंपरा शेकडो वर्षे जुनी आहे. पूर्वी मंदिराचे मालक ‘श्रीं’च्या पादुका गळ्यात घालून पंढरपूर येथे जायचे. त्यानंतर १९०४ मध्ये त्याला पहिल्यांदा वारीचे स्वरूप प्राप्त झाले. यंदाचा पालखी सोहळा हा १२० वा आहे.

चौदा दिवसांची वाटचाल
सोपानकाका यांच्या पालखी सोहळ्याची वाटचाल चौदा दिवसांची आहे. ज्येष्ठ वद्य द्वादशीला पालखीचे प्रस्थान होऊन आषाढ शुद्ध दशमीला पालखी पंढरपूरला पोहोचते. हे अंतर जवळपास १९० किलोमीटर आहे.

मुक्कामाची ठिकाणे
पांगारे, मांडकी, निंबुत, सोमेश्‍वर, कोऱ्हाळे, माळेगाव, बारामती, लासुर्णे, निरवांगी, अकलूज, बोंडले, भंडी शेगाव, वाखरी अशी सोहळ्याची मुक्कामाची ठिकाणे आहेत. श्री क्षेत्र पंढरपूर येथे सोहळ्याचा शेवटचा मुक्काम असतो.

वाटचालीचा दिनक्रम
पहाटे पाच वाजता ‘श्रीं’ची काकड आरती व अभिषेक होतो. सकाळचे कीर्तन पाच ते सहा यावेळेत होते. त्यानंतर, सकाळी सहा वाजता पालखी पुढील मुक्कामाच्या ठिकाणी मार्गस्थ होते. पालखी सोहळ्याच्या परतीचा मार्ग साधारण तोच असून सात दिवसांचा आहे.

विसाव्याजवळ ‘श्रीं’ना नैवेद्य
वाटचालीत दुपारच्या विसाव्याच्या ठिकाणी ‘श्रीं’ना नैवेद्य दाखविला जातो. त्यानंतर सायंकाळी मुक्कामाच्या ठिकाणी पालखी पोहोचल्यावर धुपारती केली जाते. सायंकाळचे कीर्तन आठ ते दहा या वेळेत होते. रात्री दहा वाजता नेवैद्य दाखवून शेजारती केली जाते.

वाटचालीत ठळक वैशिष्ट्ये
वारकरी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने वारी करतात. त्यांच्या भजनाचे क्रम, चाली इत्यादी ठरलेल्या असून फक्त सांप्रदायिक असतात.

दोन गोल रिंगण
पालखी सोहळ्यात दोन ठिकाणी गोल रिंगण होते. पहिले रिंगण वाघळवडी किंवा सोमेश्‍वरनगरमध्ये होते. दुसरे रिंगण माळेगाव येथे होते.

दोन उभी रिंगणे
पालखी सोहळ्यात दोन उभी रिंगणेही होतात. कोकाटे वस्ती (माळेगाव कॉलनी) येथे पहिले उभे रिंगण होते. तर वाखरीजवळ दुसरा रिंगण सोहळा होतो.

दिंड्यांची संख्या १०८
ंसंत सोपानकाका पालखी सोहळ्यात प्रामुख्याने पुणे जिल्हा आणि मराठवाड्यातील दिंड्या सहभागी होत असतात. सध्या दिंड्यांची संख्या १०८ आहे.

वाहतुकीची मुख्य अडचण
पालखी सोहळ्याला बऱ्याच अडचणी भेडसावत असतात. परंतु, मुख्य अडचण म्हणजे वाहनांची गर्दी. पुरेसा पोलिस बंदोबस्त नसल्यामुळे पालखी सोहळ्याला वाहनांचा मोठा त्रास सहन करावा लागतो. वाहतूक नियंत्रण केले जात नाही.

केंजळे कुटुंब मानकरी
सोरटेवाडी येथील केंजळे कुटुंब हे पालखी रथाची बैलजोडीचे मानकरी आहेत. त्यांना पूर्वीपासून बैलजोडीचा मान मिळाला आहे.

वर्षभरातील कार्यक्रम
सोपानकाका यांच्या समाधी मंदिरामध्ये वर्षभर ‘श्रीं’ची रोज काकडआरती व अभिषेक होतो. दुपारी नेवैद्य, प्रवचन होते. पोशाख चढविला जातो. सायंकाळी हरिपाठ व रात्री शेजारती केली जाते. याव्यतिरिक्त दर एकादशीला रात्री कीर्तन होते. सर्व संतांचे सोहळे, सोपानदेव समाधी सोहळा इत्यादी कार्यक्रम होतात.

समाधी दिनानिमित्त यात्रा
मार्गशीर्ष महिन्यात सोपानकाका यांचा समाधी दिनसोहळा असतो. त्यानिमित्ताने मुख्य यात्रा असते. मार्गशीर्ष वद्य अष्टमी ते मार्गशीर्ष वद्य त्रयोदशीपर्यंत अखंड हरिनाम सप्ताह होतो. त्रयोदशीच्या दिवशी समाधी वर्णनाचे कीर्तन होते.

मंदिराची कार्यकारणी
गोसावी घराण्यातील चार व इतर चार अशी आठ सदस्यांची कार्यकारणी आहे. ॲड. त्रिगुण गोपाळ गोसावी, गोपाळ गोविंद गोसावी, गौतम गदाधर गोसावी, सचिन गजानन गोसावी, केशव नामदेव नामदास, सुनील बोरावके, भाऊसाहेब वासाणे, आनंदीकाकी चंदुकाका जगताप यांचा त्यामध्ये समावेश आहे. ॲड. त्रिगुण गोपाळ गोसावी हे मंदिराचे अध्यक्ष व सोहळाप्रमुख म्हणून काम पाहत आहेत.
---

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT