पिंपरी-चिंचवड

ज्येष्ठांच्या संरक्षणासाठी कठोर कायद्याची गरज

CD

आशा साळवी ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ११ ः ज्येष्ठ नागरिकांना संरक्षण नाही. मोकाट प्राण्यांमुळे ज्येष्ठ नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. रस्त्यावर भटकी कुत्र्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे रस्तावरून ये-जा करताना त्यांच्या त्रास होत आहे, आपल्याकडे प्राण्यांना संरक्षण आहे. मात्र, ज्येष्ठांना संरक्षण नसल्याने अनेकांच्या जीवावर बेतले आहे. कायद्याने ज्येष्ठांना संरक्षण देण्याची मागणी जुनी सांगवी-चंद्रमणीनगर यश ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांनी केली. ‘सकाळ’च्या ‘संवाद ज्येष्ठांशी’ या उपक्रमात त्यांनी समस्‍या मांडल्या.

यावेळी अध्यक्ष चंद्रकांत बाराथे, सचिव बाळासाहेब सोनवणे, उपाध्यक्ष त्रिंबक देशमुख, खजिनदार ज्ञानेश्वर शिंगाडे, कार्याध्यक्ष सूर्यकांत वराडकर, हिशोब तपासनीस अब्दुल कादर सैफल मुल्ला, संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक संतोष कांबळे, प्रदीप वीर, दत्तात्रेय गुढीसागर, कुंडलिक जाधव, चंद्रकांत काटे, अशोक भोसले, सुरेश कांबळे, दिलीप मुकुटमल, अशोक आल्हाट, वसंत झुंजरे, विलास हिंगे, प्रकाश कोळी, राजू कुन्नूस्वामी , अशोक गायकवाड, परशुराम जाधव, अब्दुलहमीद शेख, अरुण राणे आदी उपस्थित होते.


संघाचे उपक्रम
- सभासदाचे वाढदिवस साजरे करणे
- सत्कार समारंभ व कौंटुबिक स्नेह मेळावा
- आरोग्य शिबिरे
- डॉक्टरांची व्याख्याने
- धार्मिक ठिकाणी सहली

संघाचे वेगळेपण
संघाची सदस्यांकडून २०११ पासून ‘वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. दिवंगत अध्यक्ष साहेबराव कांबळे यांच्या संकल्पनेतून ज्येष्ठ नागरिक संघांनी ज्येष्ठांच्या वाढदिवसानिमित्त पर्यावरण पूरक उपक्रम घेण्याचा निर्णय झाला. हा उपक्रम चौदा वर्षापासून राबवण्यात येत आहे हे संघाचे वेगळेपण आहे .दररोज सदस्य वाचण्‍यासाठी सहा दैनिक वर्तमान पत्रे आणि पिण्याचा पाण्यासाठी ॲक्वागार्ड आहे.


आकडे बोलतात
यश ज्येष्ठ नागरिक संघ, जुनी सांगवी
स्थापना ः १५ ऑगष्ट २०१७
सभासद संख्या ः ३१२
पुरुष संख्या ः २७२
महिला संख्या ः ४०


ज्येष्ठ नागरिक म्हणतात..
दत्तात्रेय गुढीसागर म्हणाले, ‘‘सांगवी महापालिका आणि जिल्हा रुग्णालय या ठिकाणी सोनोग्राफीची मशिन बंद आहे. नागरिकांची ॲन्जोग्राफी होत नाही. औषधांचा तुटवडा आहे.’’ कर्मचाऱ्यांकडून वा बोललं जाते.’’
दिलीप त्रिंबके म्हणाले, ‘‘ केंद्र शासनाची ‘आयुष्यमान योजना’ ही नावालाच आहे. प्रत्यक्षात ज्येष्ठांना उपचार मिळत नाही.’’
अरुण राणे म्हणाले, ‘जुनी सांगवीमधील टपाल कार्यालय उतारावर असल्याने ज्येष्ठ पडल्याच्या घटना घडत आहेत.’’
सीताराम गवारे म्हणाले, ‘‘जुनी सांगवी ते हडपसर बस बंद केली आहे. त्या बसला मोठी मागणी आहे, ती बस सुरू करावी.’’
प्रदीप वीर म्हणाले, ‘‘जुनी सांगवी ते वाघोली, जुनी सांगवी ते सिंहगड ला जाण्यासाठी पीएमपीने फेऱ्या वाढवाव्यात.’’
त्रिंबक देशमुख म्हणाले, ‘‘स्वारगेट ते सांगवी बस मोठ्या प्रमाणामध्ये नादुरुस्त अवस्थेत आहे. बसमध्‍ये पावसाचे पाणी गळत असल्याने छत्री धरण प्रवास करावा लागतो. मोडकळीस बस आल्या आहेत. नव्या बसेस द्याव्या.’’
प्रकाश कोळी म्हणाले, ‘‘जुनी सांगवीमध्ये रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पार्किंग केली जाते. फेरीवाले, वाहने पदपथावर असल्यावर ज्येष्ठांनी चालायचे कसे?’’
विलास हिंगे म्हणाले, ‘‘खासगी ट्रॅव्हल्सला कुंभारवाड्याजवळ ‘पिक
अप पॉईंट’ द्यावा. वाहतूक कोंडी कमी होईल.’’


सूर्यकांत वराडकर म्हणाले, ‘‘सांगवी सर्वे क्रमांक १२ , १३ येथील क्रीडा संकुल संकुलासाठी निधी उपलब्ध आहे. क्रीडा संकुल नागरिकांसाठी सुरू करावे.’’
कुंडलिक जाधव म्हणाले, ‘‘छोट्या गल्लीत गाड्या पार्क केल्या जातात. तसेच सिग्नल देखील बंद असतात त्यामुळे अपघात होतात.’’
चंद्रकांत काटे म्हणाले, ‘‘ ईपीएस ९५ साठी आंदोलन सुरू आहे. ज्येष्ठांना पाचशे रुपये पेन्शन दिली जाते त्यामध्ये वाढ करण्यात यावी.’’


३५८०

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT