पिंपरी-चिंचवड

‘सीसीटीव्ही’द्वारे शहरावर ‘एआय’चा वॉच स्मार्ट सिटीकडून पहिल्यांदाच वापर; नवीन २,७५० कॅमेरे

CD

पिंपरी, ता. २२ ः आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (एआय) वापर सध्या सर्वच क्षेत्रात वाढला आहे. या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आता पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठीही केला जात आहे. कारण, ‘एआय’ तंत्रज्ञान असलेले तब्बल दोन हजार ७५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे शहरात उभारले जात आहे. सर्वाधिक गर्दीची ठिकाणे, महत्त्वाचे चौक, अपघात प्रवण क्षेत्र आदी ठिकाणांवर अत्याधुनिक कॅमेऱ्यांद्वारे पाळत ठेवली जाणार आहे. वाहतुकीच्या कायद्यांची कडक अंमलबजावणी व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हे कॅमेरे उपयुक्त ठरणार आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने वोल्क्सरा टेन्को सोल्यूशन कंपनीच्या सहकार्याने शहरातील विविध भागांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. या संपूर्ण प्रणालीवर देखरेख करण्यासाठी निगडित नियंत्रण कक्ष उभारला आहे. चिंचवड स्टेशन, इंद्रायणीनगर, आकुर्डीतील खंडोबा माळ चौक, निगडीतील टिळक चौक, प्रभाग कार्यालये, रुग्णालये, शाळा, उद्याने अशा जवळपास ६०६ ठिकाणी कॅमेरे बसविले आहेत. त्याद्वारे अपघात, आक्षेपार्ह गोष्टींवर करडी नजर ठेवली जात आहे.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
एएनपीआर आरएलव्हीडी प्रकारात मोडणारे हे सीसीटीव्ही कॅमेरे अत्याधुनिक प्रणाली वापरून बनविले आहेत. त्यांतील प्रणाली २४ तास कार्यरत राहून, ३६० अंशामधील घडामोडी चित्रित करू शकते. यामुळे शहरात घडणाऱ्या सर्व घडामोडींचे बारकाव्याने चित्रीकरण केले जाऊ शकते.

आतापर्यंतची कामगिरी
महापालिका व स्मार्ट सिटी पहिल्यांदाच अशा प्रकारचा प्रकल्प राबवीत आहे. सध्या शहरात प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेल्या प्रकल्पामुळे आतापर्यंत ३०० हून अधिक अपघात व विविध आक्षेपार्ह घटना चित्रीकरणामुळे उघडकीस आल्या आहेत. पोलिसांनाही याची मदत होत आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आतापर्यंत ३० पेक्षा अधिक तक्रारी निकाली काढल्या आहेत. तसेच वाहतूक नियम मोडल्यामुळे सुमारे सात हजार जणांना ई-चलनद्वारे दंड ठोठावला आहे. शहरातील उर्वरित भागातही आणखी ७३० कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.

‘‘स्मार्ट सिटीने सुरू केलेल्या उपक्रमामुळे वाहतूक नियमन सुधारण्यास मदत झाली आहे. नागरिकांसाठी सुरक्षित वातावरण तयार होण्यास हातभार लागणार आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने ‘एआय’च्या मदतीने टाकलेले अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल आहे. ‘एआय’च्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे एखाद्या घटनेला लगेचच प्रतिसाद देणे शक्य होत आहे.
- किरणराज यादव, मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी

‘‘एआय-संचालित सीसीटीव्ही शहरात पाळत ठेवण्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त आहेत. महापालिका आणि शहरातील वातावरण सुरक्षित ठेवण्यास मदत होणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालत नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले आहे. सध्याच्या प्रकल्पामुळे सकारात्मक बदल दिसतील अशी आशा आहे.
- सायली लाड, संस्थापक संचालक, वोल्क्सरा टेन्को सोल्यूशन

फोटोः 48483, 48484

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आरोपी Akshay Shinde याच्या मृत्यूमागे रश्मी शुल्कांचा हात, नाना पटोलेंचा खळबळजनक आरोप

Akshay Shinde Encounter: ''स्वसंरक्षण की हत्या?'' अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर उपस्थित होताएत 'हे' प्रश्न; न्यायमूर्तींमार्फत चौकशीची मागणी

Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर वेळी नक्की काय घडलं? पोलिसांवर का व्यक्त केला जातोय संशय? वाचा इनसाईड स्टोरी

Akshay Shinde: एन्काऊंटर पूर्वी अक्षय शिंदे आपल्या आईशी शेवटचं काय बोलला?

Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदेला पोलिस नेमकं कुठे घेऊन जात होते? गृहमंत्री फडणवीसांनी सांगितला घटनाक्रम

SCROLL FOR NEXT