पिंपरी-चिंचवड

श्री राम मंदिर राष्ट्रार्पणानिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये ‘रथयात्रा’

CD

पिंपरी, ता. २० : अयोध्येतील श्रीराम मंदिर राष्ट्रार्पण व मूर्ती प्राणप्रतिष्ठेनिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये रविवारी (ता. २१) भव्य ‘रथयात्रा’ आयोजित केली आहे, अशी माहिती भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी दिली. प्रभू श्रीराम मंदिराचे राष्ट्रार्पण आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त देशभरात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण आहे. शहरातही श्री राम मंदिर आणि श्रींच्या आगमनाचा उत्सव दिमाखदार होणार असून रविवारी (ता.२१) दुपारी ३ वाजता निगडीतील भक्ती-शक्ती चौक येथून ‘रथयात्रा’ काढण्यात येणार आहे. या यात्रेचा समारोप चिखलीतील रामायण मैदान येथे होणार आहे.
या रथयात्रेत हजारो दुचाकी व चारचाकी, चार विजयरथ, राम मंदिर प्रतिकृती, मर्दानी खेळ, डी.जे. ढोल पथक, झांज पथक, श्रीराम जिवंत देखावा, गंगा आरती, सनई चौघडे, महाबली हनुमान, कलश यात्रा, आतषबाजी यासह हिंदू धर्माबाबत जागृती करण्यासाठी विविध देखावे असतील. महिलांची बुलेट फेरी देखील असणार आहे.

हिंदू धर्म संस्कृती आणि अखंड भारताच्या अस्मितेचे प्रतीक प्रभू श्रीराम मंदिरासाठी पाचशे वर्षांपासून भारतीयांना प्रतीक्षा करावी लागली आहे. अनेक दिवस पाहिलेले स्वप्न आता सत्यात उतरत आहे. राम मंदिर राष्ट्रार्पण दिनाच्या पूर्वसंधेला भव्य रथयात्रा होणार असून या सोहळ्यात पिंपरी-चिंचवडकरांनी सहभागी व्हावे.
- महेश लांडगे, आमदार, भोसरी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Adani Group: अदानी 6 हजार कोटींना विकत घेणार 90 वर्षे जुनी कंपनी, काय आहे खास ?

IND vs BAN 1st Test : Jasprit Bumrah चा चेंडू सोडण्याची चूक अन् बांगलादेशी फलंदाजाची दांडी गुल; रचले गेले ५ मोठे विक्रम

Kashedi Ghat : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील एक भुयारी मार्ग आजपासून बंद; काय आहे कारण?

CM Eknath Shinde : "सीएम साहेबांचा दरवाजा बंद ? " मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा व्यवस्थेने चक्क आमदाराला नाकारला प्रवेश !

India Economy : भारत २०३१ पर्यंत तिसरी अर्थव्यवस्था; ‘एस अँड पी’चा अहवाल

SCROLL FOR NEXT