पिंपरी-चिंचवड

नव्वद टक्के आजार हे मानवी मनाशी संबंधित

CD

पिंपरी, ता. २५ ः अंतर्मनाने बाह्यमनाला आदेश दिला की, शरीरात रासायनिक प्रक्रिया घडून बदल घडतात हे संशोधनाने सिद्ध झाले आहे. नव्वद टक्के आजार हे मानवी मनाशी संबंधित असतात. यावर नियंत्रण ठेवायचे असेल तर मनाला निरोगी ठेवावे. निरोगी जीवन जगण्यासाठी सकारात्मक विचारांबरोबरच नियमित व्यायाम, प्राणायाम देखील आवश्यक आहे. असे मार्गदर्शन डॉ. दत्ता कोहिनकर यांनी केले. चिंचवड गावात आयोजित करण्यात आलेल्या जिजाऊ व्याख्यानमालेत ते बोलत होते. चिंचवड गावातील गांधी पेठ तालीम मित्र मंडळाच्यावतीने आयोजित व्याख्यानमालेत सामाजिक व प्रबोधनात्मक व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. व्याख्यानमालेचे पहिले पुष्प डॉ. कोहिनकर यांनी गुंफले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी प्रा. तुकाराम पाटील होते. तसेच गांधी पेठ तालीम मित्र मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, सुरेश भोईर, व्याख्यानमालेचे समन्वयक सुहास पोफळे, शंकरराव देशमुख, रामदास स्वामी, जयंत कुलकर्णी, किरण ठिपसे, दिलीप कुलकर्णी, संतोष जंगम, रंजना जोशी, हेमा सायकर, सुहास मेहता, रमेश कुलकर्णी आदी उपस्थित होते. सुहास पोफळे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. काका गावडे यांनी सूत्रसंचालन केले. जगदीश घुले यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT