पिंपरी-चिंचवड

अतिक्रमणे हटवून द्या ज्येष्ठांना आधार

CD

आशा साळवी ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ४ ः आकुर्डी गुरुद्वारा- वाल्हेकरवाडी या तीस फुटी रस्त्यावर अतिक्रमण झाल्यामुळे रस्ता वीस फूट झाला आहे. या रस्त्यावर सांडपाणी वाहत असल्याने दहा फूट रस्त्यावरून चालावे लागत आहे. रस्ते अरुंद झाल्याने रस्ता ओलांडणे अवघड झाले आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक त्या रस्त्यावरून घसरून जखमी होत आहेत. महापालिकेने येथील अतिक्रमण हटवावे तसेच सांडपाण्यासाठी चेंबरची सोय करावी, अशा विविध समस्या ‘सकाळ’च्या ‘संवाद ज्‍येष्ठांशी’ या उपक्रमार्तंगत गुरुद्वारा वाल्हेकरवाडी ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांनी मांडल्या आहेत.

गुरुद्वारा वाल्हेकरवाडी येथील मंदिरात हा उपक्रम घेण्यात आला. यावेळी संघाचे अध्यक्ष राजाराम वाडकर, उपाध्यक्षा शोभा करमासे, सचिव देविदास पाटील, पंढरीनाथ वाणी, खजिनदार दत्तात्रेय शेळके, सल्लागार सुधाकर पाटील, सदस्य सुनंदा वाळके, दशरथ शिंदे, बाळकृष्ण जाधव, वसंत कांबळे, विनोद जाधव, अनुराधा राजुवंडे, शोभा पंडित, राजाबाई वालुरे आदी उपस्थित होते.


आकडे बोलतात
ज्येष्ठ नागरिक संघ, गुरुद्वारा वाल्हेकरवाडी
संघ स्थापना ः १९ नोव्हेंबर २०१३
सभासद संख्या ः ३७०
पुरुष संख्या ः २४०
महिला संख्या ः १३०

संघाचे वेगळेपण
एखाद्या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्यास त्‍यांच्या कुंटूबियांना अंत्यविधीसाठी सातशे रुपयांची आर्थिक मदत पुरवली जाते. सभासदांच्या कुटुंबातील विज्ञान शाखेतून बारावी शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना पुस्तक व वह्यांसाठी मदत पुरवण्यात येते. आजारी सभासदांना औषधांचा पुरवठा करण्यात येतो. ज्येष्ठांना अन्नधान्याचे वाटप करण्यात येते. गरजू ज्येष्ठ सभासदांना चालण्यासाठी काठी देण्यात आली. अशाप्रकारे अकरा सूत्री कार्यक्रम आखला आणि राबविण्यात येतो.

संघाचे उपक्रम
- संघामध्‍ये प्रजासत्ताक दिन साजरा
- दरवर्षी दत्तजयंतीनिमित्त कार्यक्रम
- प्रत्येक महिन्याअखेरीस सभासदांचे वाढदिवस साजरे
- प्रबोधनपर सांप्रदायिक व्याख्‍याने
- ज्येष्ठांची मोफत आरोग्य तपासणी
- ज्येष्ठ नागरीकांना औषध वाटप
- ज्येष्ठ नागरिकांच्या जलद चालण्याच्या स्पर्धा
- पालखीत वारकऱ्यांना अन्नदान करणे
- महाशिवरात्रीनिमित्त फराळ वाटप करणे
- वर्षातून सहली


ज्येष्ठांच्या समस्या
पंडित बडगुजर म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांना सहा महिन्यापासून हप्ता मिळणे बंद झाले आहे.’’
विमल वाळकोळे म्हणाल्या, ‘‘विधवा ज्येष्ठांना महापालिकेने दरमहा पेन्शन सुरु करावी.’’
अशोक चौधरी म्हणाले,‘‘ शहरातील ज्येष्ठ नागरीकांना शासकीय, महापालिका रुग्णालयात स्वतंत्र रांग असावी.’’
भानुदास कुलकर्णी म्हणाले,वैद्यकीय सुविधांसाठी ज्येष्ठांना कार्ड देण्यात यावे.’’
शरद शिंदे म्हणाले,‘‘सार्वजनिक आरोग्य शिबिर घेतले पाहिजेत.’’
विश्‍वनाथ खोत म्हणाले,‘‘ज्येष्ठ नागरीकांना दवाखान्याची सोय करावी.’’
सत्यभामा मोटे म्हणाल्या, ‘‘साईबाबा कॉलनीत रस्त्याचे डांबरीकरण उखडले आहे. लोकप्रतिनिधी लक्ष देत नाहीत.’’
शोभा पंडितच म्हणाल्या, ‘‘महासंघाने वीस अर्ज भरून घेतले आहेत. मात्र, पुढची कार्यवाही करण्यात आलेली नाही. ’’
सुभाष बडगुजर म्हणाले, ‘‘वायसीएम रुग्णालयात दातांवर उपचार मिळत नाही.’’
कलावती काळभोर म्हणाल्या,‘‘ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वत्र स्वच्छतागृहांची व्यवस्था करावी.’

अनुराधा ढेरे म्हणाल्या,,‘‘रस्त्यावर खोदकाम केल्‍यामुळे रहदारीस अडचण येत आहे.’’
संगीता भोईर म्हणाल्या, ‘‘रस्त्यावर वाहने पार्क करतात. त्यावर कार्यवाही व्हावी.’’
पदमा चौधरी म्हणाल्या, ‘‘विधवांना पेन्शन देण्यात यावी’’
लक्ष्मी गावंडे म्हणाल्या,गुरुद्वारा वाल्हेकरवाडी परिसरात रस्ते प्रशस्त असावेत.’’’


‘‘महापालिकेने प्रत्येक ज्येष्ठ नागरिक संघाला विरंगुळा केंद्राची सोय केली पाहिजे. आमच्या संघाची बैठक मंदिरात घेतली जाते. उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात ज्येष्ठांचे हाल होतात.’’
- राजाराम वाडकर, अध्‍यक्ष, गुरुद्वारा वाल्हेकरवाडी ज्येष्ठ नागरिक संघ.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : जम्मू काश्मीर राज्याला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचा प्रस्ताव कॅबिनेट बैठकीत मंजूर

SCROLL FOR NEXT