पिंपरी, ता. १४ : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसचे अपघात वाढत आहेत. काही अपघातामध्ये नागरिकांना जीवही गमवावा लागला आहे. काही गंभीर जखमी झाले आहेत. चालू वर्षात जानेवारी ते जून या सहा महिन्यात ३४ अपघात झाले असून, यामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातांमध्ये ठेकेदाराच्या बसने होणाऱ्या अपघाताचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते.
पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच लगतच्या ग्रामीण भागातही बस सेवा पुरवली जातो. या बसगाड्या विविध मार्गावर धावतात. यामुळे प्रवाशांची सोय होते. दरम्यान, या बसचे किरकोळ तसेच मोठे अपघात होत आहेत. अरुंद रस्ते, वाहतूक कोंडी, रस्त्यालगत असलेले पार्किंग आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन या कारणामुळे अपघात होत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येते. मात्र, अनेकदा पीएमपी बसवरील चालकाला गर्दीत वाहन चालवण्याच्या अनुभवाचा अभाव, बसवरील नियंत्रण सुटणे, वाहतूक नियमांचे पालन न करणे, यामुळे देखील अपघात होत असल्याचे समोर येते.
तसेच इतर वाहन चालकांनी बससमोर अचानक वाहन थांबविणे, बीआरटी मार्गात अचानक खासगी वाहन घुसडणे. यामुळे बसचालकाचा गोंधळ उडतो. अशावेळी देखील अपघाताच्या घटना घडतात.
-------------
प्रवाशांचा खोळंबा
अनेकदा अपघात झाल्यानंतर गर्दी होते व बस थांबवली जाते. त्यामुळे प्रवासी ताटकळत थांबतात. पोलिस व पीएमपीचे अधिकारी मध्यस्थी करून तो वाद मिटवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, तोपर्यंत बसमधील प्रवाशांचा खोळंबा होतो.
--------------------
अपघातात ठेकेदारी बस आघाडीवर
एकूण अपघातात ठेकेदारी बसच्या अपघाताचे प्रमाण अधिक आहे. मागील सहा महिन्यात ३४ अपघातांची नोंद झाली. यामध्ये खात्याच्या बसने ९ तर ठेकेदाराच्या बसने तब्बल २५ अपघात झाले आहेत. दरम्यान, ठेकेदाराच्या बसवरील चालकांना योग्य प्रशिक्षण देण्याची मागणी होत आहे.
----------------------------------
११ जणांचा मृत्यू ; १३ गंभीर जखमी
सहा महिन्यातील ३४ अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला. तर १३ जण गंभीर जखमी झाले आहेत. यासह १० जण किरकोळ जखमी झाले आहेत.
--------
वाहन चालकांना वेळोवेळी प्रशिक्षण दिले जात असते. सुरक्षितरीत्या वाहन चालविण्यासह प्रवाशांची काळजी घेण्याबाबत सूचना दिल्या जात असतात. यासह बसच्या देखभाल- दुरूस्तीकडे अधिक लक्ष दिले जात असते.
- सतीश घाटे, जनसंपर्क अधिकारी, पीएमपीएमएल.
----------
तीन महिन्यातील अपघात
महिना अपघात
जानेवारी १०
फेब्रुवारी ३
मार्च ४
एप्रिल ७
मे ७
जून ३
------------------------------
एकूण ३४
-----------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.