पिंपरी, ता. १९ : युनियन बँक ऑफ इंडिया या बँकेचा लोगो आणि नावाचा वापर करून वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकाद्वारे नागरिकांना त्यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड अपडेट करण्याबाबत मेसेज येत आहेत. त्यामध्ये एक फाइल पाठवली जात असून ती फाइल ओपन करताच त्यांच्या बँक खात्यातील रक्कम काढून घेतली जात आहे. यामधून नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे. तरी नागरिकांनी अशा प्रकारची लिंक अथवा फाइल ओपन करू नये, असे आवाहन पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सायबर सेलने केले आहे.
बँकेच्या नावाचा व लोगोचा वापर करून नागरिकांना मेसेजद्वारे Union Bank Addhar Update61.apk या नावाची एक फाइल पाठवली जात आहे. या फाईलद्वारे नागरिकांच्या मोबाईलमध्ये Torzon Virus पाठवून मोबाईलमधील सर्व वैयक्तिक माहिती घेतली जाते. त्या माहितीचा गैरवापर करून नागरिकांची फसवणूक आणि नुकसान केले जात आहे. त्यामुळे नागरिकांनी अनोळखी मोबाईल क्रमांकाद्वारे आलेल्या मेसेजमधील कोणतीही लिंक, वेबसाइट अथवा फाइलवर क्लिक करू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.