पिंपरी-चिंचवड

‘एक हजार हप्ता दिला नाही तर, जिवंत सोडणार नाही’

CD

पिंपरी, ता. २६ : एक हजार रुपये हप्ता दिला नाही तर जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देत आरडाओरडा करून दहशत निर्माण केल्याप्रकरणी तिघांना पिंपरी पोलिसांनी अटक केली. हा प्रकार चिंचवड, मोहननगर येथील गाय वासरू चौकात घडला.
संजय ऊर्फ बाबाभाई बिरप्पा वाघमोडे (वय ३१), कौस्तुभ संजय कानकात्रे (वय २४), प्रमोद संतोष बंडगर (वय २१, तिघेही रा. महात्मा फुलेनगर, चिंचवड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सतीश मोहन चौधरी (रा. मोहननगर, चिंचवड) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे मोहननगर येथील गायवासरू चौकात चौधरी स्नॅक्स सेंटर व लंचहोम नावाचे हॉटेल आहे. आरोपी हे या हॉटेल समोर आले. ‘आम्हाला वडापाव द्यायचा व त्याचे पैसे घ्यायचे नाहीत, असे म्हणत ‘मी इथला भाई आहे. मला एक हजार रुपये हप्ता द्यायचा’ अशी धमकी दिली. त्यानंतर चौधरी यांना शिवीगाळ करीत हाताने व खुर्चीने मारहाण केली. ‘तू जर मला एक हजार रुपये हप्ता दिला नाही तर तुला जिवंत सोडणार नाही,’ असे म्हणत आरोपींनी आरडाओरडा करीत दहशत निर्माण केली. चौधरी यांना जिवे मारण्याची धमकी देत पैसे न देता आरोपी हॉटेलमधून वडापाव घेऊन गेले. पिंपरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT