पिंपरी - भरधाव पीएमपी बसने धडक दिल्याने दुचाकीवरील दोघा मित्रांचा मृत्यू झाला. ही घटना चिंचवड येथील रेल्वे पुलावर घडली.
महेश भाऊसाहेब नरवडे (वय- २०, डांगेचौक, थेरगाव) व सागर अरुण कदम (वय १९, रा. डांगेचौक, थेरगाव) अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सुधाकर भाऊसाहेब नरवडे (रा. थेरगाव) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बसचालक संभाजी शंकर राशीनकर (वय ३३, रा. भीमा कोरेगाव, ता. शिरूर) याला पोलिसांनी अटक केली आहे.
फिर्यादी यांचे भाऊ महेश व त्यांचा मित्र सागर हे दोघेजण शनिवारी (ता. २९) रात्री चिंचवडगावातील चापेकर चौकाकडून चिंचवड स्टेशनकडे येत होते. दरम्यान, चिंचवड रेल्वे पूल येथे त्यांच्या दुचाकीला पीएमपीच्या भरधाव बसने धडक दिली. या अपघातात सागर आणि महेश या दोघांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. तसेच दुचाकीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.