पिंपरी-चिंचवड

निगडीत तरुणावर प्राणघातक हल्ला शस्त्र हवेत फिरवत माजवली दहशत

CD

पिंपरी, ता. १० : जुन्या भांडणाच्या रागातून तरुणाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करीत पालघनने प्राणघातक हल्ला केला. यासह पालघन हवेत भिरकावत आरडाओरडा करीत दहशत माजविल्याची घटना निगडी येथे घडली.
राहुल दत्ता कुदळे (वय २२, रा. पत्राशेड, पीसीएमसी स्कूलसमोर, निगडी) असे या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बबलू मोरे, जितेंद्र जाधव, अमन शेख, शेखर माने (सर्व रा. ओटास्कीम, निगडी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे त्यांच्या घराच्या अंगणात उभे असताना आरोपींनी जुन्या भांडणाच्या रागातून फिर्यादीला हाताने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. शिवीगाळ व दमदाटी केली. दरम्यान, आरोपी बबलू याने फिर्यादीच्या डोक्यात पालघन मारून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर बबलूने पालघन हवेत भिरकावत आरडाओरडा केला. ‘मी इथला भाई आहे’ असे म्हणत नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली. निगडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.
--------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT