पिंपरी-चिंचवड

भोसरी विधानसभा नवमतदार

CD

भोसरी विधानसभा नवमतदार
---
आपल्या राज्यघटनेने अठरा वर्षांवरील सर्वांना मतदानाचा हक्क दिला आहे. तो मलाही मिळाला आहे. त्यामुळे मला मतदान करता आले. लोकशाही बळकट करण्यासाठी मतदानाचा वापर करणार आहे.
- दिनेश काशीद, चिखली

मला प्रथमच मतदानाचा हक्क मिळाला आहे. त्यामुळे आनंद झाला आहे. निवडणूक व मतदान प्रक्रियेबाबत उत्सुकता होती. एक सजग नागरिक म्हणून मतदान केले आहे. आज कर्तव्य पार पाडता आले आहे.
- अनिकेत इधाटे, मोरे वस्ती

निवडणूक जाहीर झाल्यापासून मतदान करण्याबाबत उत्सुकता होती. मी पहिल्यांदाच मतदान करत आहे. मतदानाचा हक्क मिळाल्याचा आनंद आहे. मतदान करून एक राष्ट्रीय कर्तव्य पार पाडल्याचा आनंद आहे.
- मोहन राऊत, चिखली

लोकशाहीच्या बळकटीसाठी मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदानाच्या माध्यमातून चांगला राज्यकर्ता निवडण्याची संधी मिळाली आहे. राष्ट्रीय कर्तव्य पार पडल्याची भावना मनामध्ये निर्माण झाली आहे.
- परी रणसुभे, चिखली

राज्यघटनेमुळे मतदानाचा हक्क मिळाला आहे. त्यामुळे भारतीय लोकशाहीत आपला राज्यकर्ता निवडण्याची संधी मला मिळाली आहे. एक नव मतदार म्हणून माझ्यासाठी मतदान करणे ही अभिमानाची गोष्ट आहे.
- वैभव तराळकर

मी पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावला आहे. आपल्या राज्यघटनेने दिलेला अधिकार म्हणजे एक अनमोल हक्क आहे. लोकशाहीच्या बळकटीसाठी प्रत्येकाने आपला हक्क बजावणे आवश्यक आहे.
- माया काशीद

मतदार म्हणून नाव नोंदणी केली होती. त्यानंतर मतदार ओळखपत्र मिळाले. तेव्हापासून मतदान करण्याची उत्सुकता व इच्छा मनात होती. ती इच्छा प्रथमच पूर्ण झाली आहे. हा अनुभव अनमोल राहिला.
- यश कारले

मतदानाचा हक्क बजावताना योग्य उमेदवाराची निवड करण्याची संधी भारतीय लोकशाहीमुळे आपल्याला मिळाली आहे. त्यानुसार मतदान करून मी अनमोल हक्क बजावला आहे. प्रत्येकाने मतदान करणे गरजेचे आहे.
- सुदेश लोखंडे

लोकसभा निवडणूक म्हणजे भारतीय लोकशाहीचा महामेळावा आहे. त्यात मतदानाच्या रूपाने भाग घेण्याची संधी सर्वांना मिळाली आहे. तशी संधी मलाही मिळाली आहे. त्याचा मनोमन आनंद झाला आहे.
- उदय साळुंखे

मतदार यादीत नाव आल्याने सकाळीच जाऊन मी मतदानाचा हक्क बजावला. मतदान करण्याचा पहिलाच अनुभव होता, तो खूप चांगला राहिला. आता प्रत्येक निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहे.
- अक्षय राठोड
---

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT