पिंपरी-चिंचवड

ग्रामीण भागात मतदानाचा टक्का वाढला उरण विधानसभा मतदारसंघ ः निवडणूक प्रकिया शांततेत पार

CD

उरण, ता. १३ ः उरण विधानसभा मतदार संघात सकाळी सात वाजल्यापासूनच उत्साहात मतदानाला सुरवात झाली. या मतदार संघात शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात मतदान जास्त झाले आहे. उरणमधील ग्रामीण भागातील काही गावांमध्ये आपले अस्तित्व टिकविण्यासाठी ग्रामपंचायतीला होणाऱ्या मतदानाप्रमाणे मतदान झाले.
ज्येष्ठ नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क उत्साहात बजावला. पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणाऱ्या तरुणाईच्या चेहऱ्यावर
आनंद ओसंडून वाहत होता. दुपारच्या कडक उन्हातही मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत होते. दुपारी एकपर्यंतचा उरण विधानसभा मतदानाचा टक्का हा २९.२७ टक्के होता तर चारपर्यत ४२.१७ टक्के होता. उरण विधानसभा मतदार संघात आपले अस्तित्व टिकविण्यासाठी प्रत्येक पक्ष जोमाने कामाला लागले होते. आपल्या उमेदवाराला कसे जास्त मतदान होईल, यासाठी कार्यकर्ते मतदारांना मतदानासाठी घेऊन जात होते.
मतदारांना ऊनाचा त्रास होऊ नये, यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ठिकठिकाणी मंडपाची व्यवस्था केली होती. तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. उरण येथील यूइएस हायस्कूलमध्ये मतदारांना आकर्षित करण्यासाठी फुग्यांची सजावट करण्यात आली होती. मतदारसंघात कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. सर्वच ठिकाणी मतदान शांततेत पार पडले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT