पिंपरी-चिंचवड

उत्साह, उत्सुकता, रांगा अन् निराशाही चिंचवड विधानसभा मतदारसंघातील स्थिती, तरुणांसह ज्येष्ठांचा मोठा प्रतिसाद

CD

पिंपरी,ता. १३ ः सकाळी सात वाजल्यापासूनच मतदारांनी मतदानासाठी लावलेल्या रांगा, मतदान केंद्रप्रमुखांकडून करण्यात आलेली तयारी, मतदारांच्या स्वागतासाठी काढण्यात आलेल्या रांगोळ्या, मतदानाची उत्सुकता, मतदारयादीत नाव नसल्याने झालेली निराशा, दुपारी गर्दी कमी झाल्यानंतर सायंकाळी परत मतदानासाठी लागलेल्या रांगा असे चित्र चिंचवड विधानसभा मतदार संघात दिसून आले. मतदार संघातील ९१ ठिकाणी ५४९ मतदान केंद्रावर मतदानाची सोय करण्यात आली होती.

सकाळी रांगा, दुपारी शुकशुकाट
चिंचवड विधानसभा मतदार संघातील चिंचवड, पुनावळे, पिंपळे गुरव, जुनी सांगवी, पिंपळे सौदागर, रावेत, किवळे, देहूरोड, वाकड, थेरगाव या सर्वच भागांतील नागरिकांनी सकाळी सातपासूनच मतदानकेंद्रांवर रांगा लावल्या होत्या. सकाळच्या टप्प्यात मतदान करण्यासाठी अनेकजण मॉर्निंग वॉकनंतर थेट मतदान केंद्रांवर आले होते. जसजसे ऊन वाढू लागले तसतसे मतदान केंद्रावरील गर्दी कमी होऊ लागली. पिंपळे गुरव वगळता इतर ठिकाणी दुपारी फारशी गर्दी दिसून आली नाही. जुनी सांगवी, वाकड, पिंपळे सौदागर या भागातील नागरिकांनी दुपारऐवजी सायंकाळीच बाहेर पडणे पसंत केले. यामध्ये तरुण, मध्यमवयीन नागरिक यांच्यासह ज्येष्ठ नागरिकांचाही मोठा सहभाग होता.

शोधूनही सापडेना यादीत नाव
मतदार यादीत नावच न आल्याने अनेक मतदारांना मतदान न करता परतावे लागले. अनेकांना घरी वोटर स्लीप न आल्याने बुथवर जाऊन स्लीप मिळवावी लागली. काही नागरिकांना तर आपल्या परिसरातील विविध मतदान केंद्रावर मतदार यादीतील नाव मिळण्यासाठी फिरावे लागले. नाव शोधण्यासाठी बीएलओ व पक्षांचे प्रतिनिधी यांच्याकडे नागरिकांनी गर्दी केली होती. सगळीकडे नाव शोधल्यानंतर ऑनलाइन पोर्टलवर शोध घेतला जात होता. त्यातूनही नाव न सापडल्याने अनेक मतदारांची निराशा झाली. वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी मतदान केल्यानंतरही आपले यादीत नाव कसे नाही ? असा प्रश्‍न निराश झालेले नागरिक विचारत होते.

सेल्फी घ्यायचाय बाहेर या
मतदान केंद्रांवर फोनला बंदी असल्याचे अनेक नागरिकांना माहिती नव्हते. मात्र, पोलिसांनी पर्स किंवा फोन घेऊन जाण्यास मनाई केल्याने अनेकांची गैरसोय झाली. ओळखपत्राची सॉफ्टकॉपी फोनमध्ये असल्याने नागरिकांना ओळखपत्र दाखवता आले नाही. त्यांना ओळखपत्र आणण्यासाठी घरी जावे लागले. दुसरीकडे जोडीने किंवा घोळक्याने आलेले मतदार एकमेकांकडे फोन देऊन मतदान करून येत होते. तर काही ठिकाणी पक्षांचे प्रतिनिधी देखील ‘तुमचा फोन आमच्याकडे ठेवा’ असे सांगत होते. काही ठिकाणी पोलिस व नागरिक यांच्यामध्ये हुज्जतही झाली. मतदानानंतर सेल्फी घेणाऱ्या तरुणांना मात्र मतदान केंद्रापासून लांब जाऊन सेल्फी घ्यावी लागली.


क्षणचित्रे
- मोबाईलला मनाई केल्याने पोलिस, नागरिक यांच्यात हुज्जत
- ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांचा उत्साह
- मतदारयादीत नाव न सापडल्याने अनेकांची निराशा
- सकाळी मतदानासाठी रांगा तर दुपारी शांतता
- उन्हापासून बचावासाठी ऐनवेळी उभारण्यात आले मांडव
- मतदारांच्या मुलांना सांभाळण्यासाठी मतदान केंद्रांवर पाळणाघराची सुविधा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT