पिंपरी-चिंचवड

श्रीरंग बारणे, संजोग वाघेरे यांना वाढीव खर्च अमान्य

CD

पिंपरी, ता. १५ ः मावळ लोकसभा मतदारसंघामधील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या निवडणूक खर्चात आढळलेल्या तफावती प्रकरणी निवडणूक विभागाने दोघांना नोटिसा बजावून खुलासा मागितला होता. त्यावर, सादर केलेल्या खर्चासह वाढीव आढळलेला खर्च दोघांनीही अमान्य केला आहे. त्यामुळे, आता त्याबाबत ४८ तासांत निवडणूक विभागाने पुन्हा त्यांच्याकडून खुलासा मागितला आहे.
निवडणूक प्रचार खर्चासाठी प्रत्येक उमेदवाराला ९५ लाखांपर्यंतची मर्यादा होती. त्यासाठी तीन वेळा खर्च तपासण्यात आला. त्यातील बारणे यांनी ४३ लाख ८१ हजार १६६ रुपये खर्च दाखवला आहे. मात्र, निवडणूक आयोगाने नोंदविलेला खर्च ५९ लाख १६६ रुपये आहे. त्यामध्ये, १५ लाख १९ हजार रुपयांची तफावत आहे. मात्र, हा खर्च बारणे यांनी अमान्य केला आहे. तसेच वाघेरे यांनी ४९ लाख ८१ हजार ६९० रुपये खर्चाचा तपशील सादर केला आहे. निवडणूक आयोगाच्या नोंदीनुसार, ५७ लाख १२ हजार ५४२ रुपये खर्च झाला आहे. परंतु, अधिकचा सात लाख ३० हजार ८५२ रुपये खर्च वाघेरे यांनी अमान्य केला आहे. त्याबाबत नोटीस मिळाल्यापासून ४८ तासांत खुलासा सादर करावा अन्यथा नमूद खर्च आपणांस मान्य असल्याची नोटीस निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी दोघांना दिली आहे. तसेच खर्च तपशील उपलब्ध न केल्याबद्दल ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक पक्षाचे उमेदवार शिवाजी जाधव आणि भिमसेनेचे उमेदवार संतोष उबाळे यांनाही विभागाने नोटीस दिली आहे. ४८ तासांत खर्च तपशील न सादर केल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल, असे नोटीसमध्ये नमूद केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT