पिंपरी-चिंचवड

पिंपरी जाहिरात शत्रुघ्न काटे

CD

होर्डिंगमुळे होणाऱ्या दुर्घटना
टाळण्याची आयुक्तांकडे मागणी

पिंपरी, ता. १५ ः घाटकोपर येथे होर्डिंग कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेत नागरिकांच्या जीवांचा बळी गेल्याची घटनेची पुनरावृत्ती आपल्या पिंपरी-चिंचवड शहरात होऊ नये, यासाठी आयुक्तांनी लक्ष देऊन कार्यवाही करावी, अशी मागणी माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.
शहरात असंख्य होर्डिंग्ज उभे आहेत. त्यामुळे अपघात होऊ नयेत, प्रशासन काय पाऊल उचलत आहे, होर्डिंग्ज किती भक्कम किंवा सुरक्षित आहे याचे परीक्षण करावे. नियमावनुसार ते आहेत का? अनेकांनी नियम पाळलेले नाहीत. होर्डिंग्ज उभे केल्यानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेतले जातोय का? चौकापासून किती अंतरावर होर्डिंग उभे केले पाहिजे? अनाधिकृत होर्डिंग्जवर काय कारवाई करणार? होर्डिंग्जमुळे शहारचे विद्रूपीकरण झाले आहे. बीआरटीएस बस स्थानकांवर इलेक्ट्रिक होर्डिंग सुरक्षित आहेत का? जाहिरात फलकांच्या वीजपुरवठाही धोकादायक होऊ शकतो, काही दिवसांत पावसाला सुरुवात होईल. जीवघेण्या होर्डिंग्जवर कारवाई करून उपाययोजना करण्याची मागणीही काटे यांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT