पिंपरी-चिंचवड

पिंपरी चिंचवड परिसरातही पब संस्कृतीला चालना रात्रीच्या हुल्लडबाजीने नागरिक त्रस्त; बाहेरील विद्यार्थ्यांवर अंकुश नसल्याने स्वैराचार वाढीस

CD

पिंपरी, ता. २३ : कल्याणीनगर येथे अल्पवयीन मुलाने मद्यपान करून गाडी चालविल्याने झालेल्या अपघाताचे पडसाद पिंपरी चिंचवडमध्येही उमटले आहेत. पिंपरी, आकुर्डी, रावेत, वाकड, ताथवडे या भागात बहुतांश खासगी शिक्षण संस्थांची शैक्षणिक संकुले आहेत. या भागात खासगी होस्टेल, पीजी किंवा फ्लॅट घेऊन अनेक परप्रांतीय विद्यार्थी राहतात. खासगी होस्टेलवर कोणतेही निर्बंध नसल्याने रात्री- बेरात्री पार्टी करणे, त्यानंतर गोंगाट करणे, रस्त्यावर जोरजोरात दुचाकी व चारचाकी चालविणे, रेसींगचा आवाज जोरात करणे, जोरात गाणी लावत गाडी चालविणे, बुलेटमधून फटाक्यांसारखा आवाज काढणे हे प्रकार या भागात सर्रास सुरू असतात. त्यामुळे परिसरात राहणारे नागरिक हैराण झाले आहेत.

नशेची साधने उपलब्ध
हिंजवडी आयटी पार्क येथे काम करणारे अनेक कर्मचारी रावेत, पुनावळे, ताथवडे भागातील सदनिका फ्लॅट घेऊन राहतात. या ठिकाणी विकेंडला उशिरापर्यंत चालणाऱ्या पार्ट्या, मोठ्याने लावलेले संगीत, बाहेरून पार्टी करून येताना होणारी हुल्लडबाजी याचा त्रास इतर सदनिकाधारकांना सहन करावा लागतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना सदनिका भाड्याने देण्यासही अनेकदा विरोध होतो. सुरवातीला वाकड, हिंजवडी परिसरात असणारी पब संस्कृती आता या भागातही येऊ पाहत आहे. रावेत, ताथवडे या भागातील हायवे नजीकही रेस्टॉरंटमध्ये पब सुरू होत आहेत. त्यामुळे विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना नशेची साधने जवळच उपलब्ध होत आहेत.

रात्री हुल्लडबाजी
पिंपरीतील एका चौकाजवळील तीन पान टपऱ्यांमध्ये नजीकच्या कॉलेजमधील उच्चभ्रू तरुण व तरुणी मोठ्या प्रमाणात हुक्क्याचे व महागडे सिगारेट पाकीट खरेदीला येत असतात. यात तरुणींचे प्रमाणही लक्षणीय आहे.
संत तुकारामनगर भागातील सदनिकांमध्ये राहणारे मुलेही मोठ्या प्रमाणात रात्री हुल्लडबाजी करताना दिसतात. सहा महिन्यांपूर्वी ‘सकाळ’ने कॉलेज परिसरात हुल्लडबाजी करणाऱ्यांची बातमी दिल्यानंतर पोलिसांनी कडक कारवाई केली होती.

‘‘बाहेरून शिकण्यासाठी आलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये स्वैराचाराचे प्रमाण वाढले आहे. आपल्या मित्रांचे अनुकरण करण्यासाठी इतर विद्यार्थीही व्यसनांच्या आहारी जातात. त्यामुळे आपल्या पाल्याला स्वैराचार व स्वातंत्र्य यातील फरक लक्षात आणून देणे ही पालकांची जबाबदारी आहे. रेस्टॉरंट, पब यांच्या वेळेवर नियंत्रण हवे.
- ॲड. ज्योती पांडे, महिला दक्षता समिती, रावेत

‘‘महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून वाहतुकीचे नियम सर्रास पायदळी तुडवले जातात. महाविद्यालय परिसरात ट्रिपल सीट गाडी चालविणे, रॅश ड्रायव्हिंग करणे, पदपथावरून गाड्या चालवणे हे नित्याचेच झालेले आहे.
- महेश सरकाळे, नागरिक, रावेत

‘‘आमच्या भागात पेईंग गेस्ट म्हणून राहणारे अनेक विद्यार्थी आहेत. त्यांच्याकडून अनेकदा वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले जाते. पब, बार यांच्यासाठीही नियम कडक नियम केले तर अशा गैरप्रकारांना आळा बसेल. येथून बाहेर पडणाऱ्यांवरही पोलिसांनी लक्ष ठेवले पाहिजे. ’
- सागर भूमकर, स्थानिक वाकड

‘‘आमच्या परिसरातील बार व पब बारानंतरही सुरूच असतात. त्यामुळे मध्यरात्रीनंतरही येथे तरुणांची मोठी गर्दी असते. पोलिसांची फारशी गस्त नसते. त्यामुळे, या पबमधून बाहेर पडणारे तरुण अनेकदा गाड्या जोरात चालवितात.
- सुरेश पारखी, स्थानिक, हिंजवडी
----------------
‘‘कोणताही गैरप्रकार होऊ नये म्हणून आमच्याकडून रात्री गस्त सुरू असते. वीस ते बावीस कर्मचारी विविध भागात गस्त घालत असतात. त्यामुळे परवानगीपेक्षा अधिक काळ रेस्टॉरंट सुरू ठेवले जाणार नाहीत, याकडे आम्ही लक्ष देत आहोत.’
- महेंद्र कदम, पोलिस निरीक्षक, रावेत पोलिस स्टेशन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT