पिंपरी-चिंचवड

पादचारी मार्ग की दुचारी मार्ग

CD

पिंपरी, ता. ७ : रस्ता ओलांडणे नागरिकांना सोयीचे व्हावे, अपघाताचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी मुंबई -पुणे महामार्गावर निगडी गावठाण येथे भुयारी मार्ग बनविण्यात आला आहे. मात्र, या मार्गातून बेशिस्त चालक चक्क दुचाकी नेतात. यामुळे पादचाऱ्यांची गैरसोय होत असून, अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
निगडी गावठाण, ओटास्कीम, यमुनानगर या भागातून प्राधिकरण या भागात येण्यासाठी मुंबई-पुणे महामार्ग ओलांडावा लागतो. यासाठी लोकमान्य टिळक चौकातून रस्ता ओलांडता येतो. मात्र, दूरचा वळसा वाचविण्यासाठी अनेकजण निगडी गावठाण येथील हनुमान मंदिराजवळून धोकादायक रस्ता ओलांडायचे. यामुळे या परिसरात अनेक अपघात घडले. अशा दुर्घटना टाळण्यासाठी व नागरिकांच्या सोयीसाठी येथे भुयारी पादचारी मार्ग व्हावा, अशी नागरिकांची अनेक दिवसांपासूनची मागणी होती. त्यामुळे महापालिकेकडून भुयारी मार्गाचे काम हाती घेण्यात आले. काही दिवसांपूर्वी हा मार्ग पादचाऱ्यांसाठी खुला करण्यात आला आहे.
या मार्गातील भिंतींवर सुंदर चित्र रेखाटण्यात आली आहेत. ही चित्रे लहान मुलांचे लक्ष वेधून घेत आहेत. बाराखडी, फळांचे चित्र यासह स्कूल ‘चले हम, बेटी बचाओ, बेटी पढाओ,’ चला जाऊ शाळेला, स्वच्छ भारत आदी संदेश देण्यात आले आहेत.
हा मार्ग केवळ पादचाऱ्यांसाठीच असून येथून दुचाकींना प्रवेश नाही. दुचाकींना प्रवेश नसल्याचा फलकही प्रवेशद्वारात लावला आहे. तरीही अनेक चालक राजरोसपणे या मार्गात दुचाकी नेतात. दुचाकींमुळे पादचाऱ्यांना चालणेही कठीण होते. पादचाऱ्यांचा गोंधळ उडतो. अनेकदा पादचाऱ्यांना दुचाकींचा धक्का लागून अपघातही घडतात. तरी मार्गातून दुचाकींना प्रवेश बंद करावा, अशी मागणी होत आहे.

अस्वच्छता अन दारूच्या बाटल्या
या भुयारी मार्गात सुंदर रंगरंगोटी केली असून, स्टाइलच्या फारशा बसविल्या आहेत. प्रकाश व्यवस्थाही आहे. मात्र, रात्री येथे मद्यपींचा ठिय्या असतो. येथेच दुर्गंधी पसरलेली असते. दारूच्या बाटल्याही पडलेल्या दिसतात. येथील दुर्गंधीमुळे पादचाऱ्यांना अक्षरशः नाकावर रुमाल धरून जावे लागते.

निगडीतील पीएमपी बसथांब्यावर उतरल्यानंतर महाविद्यालयात जाण्यासाठी पलीकडे प्राधिकरणच्या बाजूला जावे लागते. येथील महामार्ग ओलांडण्यासाठी भुयारी मार्गाचा वापर करतो. मात्र, या मार्गातून दुचाकीही जात असल्याने चालण्यास अडथळा निर्माण होतो. येथे अस्वच्छताही खूप आहे.
- प्रतीक कदम, विद्यार्थी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Vasantrao Gadgil passed away: ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचे निधन!

RBI Action: आरबीआयने चार NBFC-मायक्रो फायनान्स कंपन्यांवर केली मोठी कारवाई; कर्ज देण्यावर घातली बंदी

Murder Case : पत्नी, प्रियकराचा खून करून पतीनं उचललं टोकाचं पाऊल..; घरी दोघांचं प्रेमसंबंध कळलं अन्...

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT