पिंपरी-चिंचवड

मातंग समाजाचा तहसील कार्यालयावर मोर्चा अतिरिक्त तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन

CD

पिंपरी, ता. ७ : साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या निगडी येथील पुतळ्यालगत असणारा मेट्रो टर्मिनलचा डीपीआर बदला, यमुनानगर, निगडी येथे नियोजित डॉ. अण्णा भाऊ साठे सांस्‍कृतिक भवन उभारण्याची कार्यवाही करावी आदी मागण्यांसाठी पिंपरी-चिंचवड शहर मातंग समाज कृती समितीने तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला होता. या वेळी अतिरिक्त तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन दिले.
समितीचे संस्‍थापक संदीपान झोंबाडे यांच्‍या नेतृत्वाखाली या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डी. पी. कांबळे, अण्णासाहेब कसबे, चंद्रकांत लोंढे, रामदास कांबळे, मयूर जाधव, अनिल गायकवाड आदींसह समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्‍थित होते.
या वेळी दिलेल्‍या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, निगडी येथे लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्‍या स्‍मारकाजवळील शेवटचे मेट्रो टर्मिनल उभारणार येणार आहे. त्‍या टर्मिनलचा डीपीआर त्वरित बदलावा, यमुनानगर येथील साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक भवन मंजूर झाले असून, नियोजित चार एकर १७ गुंठे जागेतील केलेले अतिक्रमण हटवावे. तिथल्‍या अतिक्रमणास प्रोत्साहन देणाऱ्या अधिकारी व लोकप्रतिनिधींवर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करा. २०१४ रोजी साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण केंद्र या नावे (आर्टी) करीता पिंपरी चिंचवड महापालिकेने हाफकिन महामंडळाची पाच एकर जागेचा ठराव मंजूर केला आहे. तसा प्रस्ताव राज्यशासन व केंद्र शासनाकडे तत्काळ मंजूर करण्यास पाठवावा.
आद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांचे नाव महापुरुषांच्या केंद्र व शासन यादीमध्ये समाविष्ट करावे. ५. १३ टक्‍के अनुसूचित जातीच्या कोट्यात अ, ब, क, ड करून मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात वर्गीकरण करून जागा द्यावी, साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्यावा, विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या राज्यातील मातंग समाजावरील कार्यकर्त्यांवरील दाखल गुन्‍हे माघारी घ्यावेत आदी मागण्या मांडण्यात आल्‍या.

फोटोः 24583

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT