पिंपरी-चिंचवड

अक्षयतृतीयेनिमित्त नाटकांची मेजवानी

CD

पिंपरी, ता. २ ः अक्षय्य तृतीयेनिमित्त ‘सकाळ’ तर्फे १० ते १२ मे दरम्यान चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात नाट्य महोत्सव आयोजित केला आहे. त्याचे ऑनलाइन व फोन बुकिंग उपलब्ध आहेत. ‘बुक माय शो’ आणि ‘तिकिटालय’ या संकेतस्थळांवर तिकिटे उपलब्ध आहेत. या महोत्सवामध्ये भाऊ कदम, स्पृहा जोशी, संकर्षण कऱ्हाडे, ओंकार भोजने, काजल काटे, प्रिया करमरकर, अमोल कुलकर्णी आदी कलाकारांचा आविष्कार बघायला मिळणार आहे.
सध्या उन्हाळा सुरू आहे. शाळांना सुट्ट्या आहेत. विरंगुळा म्हणून कुटुंबीयांसह फिरायला जायचं म्हटलं तर प्रचंड ऊन आहे. अशावेळी मन ताजंतवानं करणारं साधनं म्हणजे नाटक आणि चित्रपट. यातील नाटकांची आणि जोडीला कधी मनाला रुंजी घालणाऱ्या तर कधी खळखळून हसविणाऱ्या कवितांच्या हलक्या-फुलक्या कार्यक्रमाची मेजवानी सर्वांना उपलब्ध होणार आहे. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात ‘सकाळ नाट्य महोत्सव’ आयोजित केला आहे. त्याअंतर्गत ‘संकर्षण व्हाया स्पृहा’ हा निखळ मनोरंजनाचा हलका-फुलका प्रयोग १० मे रोजी होईल. ११ मे रोजी ‘तू म्हणशील तसं !’ आणि १२ मे रोजी ‘करून गेलो गाव’ ही नाटकं होतील. संपूर्ण महोत्सवाचे तिकीट घेतल्यास विशेष सवलत दिली जाणार आहे. महोत्सवाचे सहप्रायोजक चिंचवड येथील ऑक्सिकेअर हॉस्पिटल आहे. ऑनलाइन बुकिंग उपलब्ध आहे.

तिकिटांचे दर (प्रतिव्यक्ती)
सीझन तिकीट (तळमजला) ः १००० रुपये
सीझन तिकीट (बाल्कनी) ः ८०० रुपये
प्रतिनाटक तिकीट (तळमजला) ः ४०० रुपये
प्रतिनाटक तिकीट (बाल्कनी) ः ३०० रुपये

महोत्सवाचे वेळापत्रक
शुक्रवार (ता. १०) : संकर्षण व्हाया स्पृहा
शनिवार (ता. ११) : तू म्हणशील तसं !
रविवार (ता. १२) : करून गेलो गाव

नाट्य बुकींगसाठी...
ऑनलाइन बुकिंग ः https://in.bookmyshow.com; www.ticketalay.com/ticketalay app
फोन बुकिंग ः ८९७५२३७०४१
अधिक माहितीसाठी संपर्क ः सचिन ः ९७३०९५९६९९

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT