पिंपरी, ता. २० ः पिंपरी-चिंचवडमधील साळी समाजाच्यावतीने श्री जिव्हेश्वर जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी श्री जिव्हेश्वर जन्मसोहळा पार पडला. चिंचवडगाव येथील प्रभू रामचंद्र सभागृहात झालेल्या सोहळ्याला पिंपरी-चिंचवड शहर व परिसरातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. सायंकाळी विविध पुरस्कार वितरण व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन, जिव्हेश्वर पूजन व आरती करून करण्यात आली. तसेच विविध क्षेत्रातील ७८ उद्योजकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. सतीश डोईफोडे, प्रदीप असरकर, राजेश उगले, राजेंद्र पांढरपट्टे, मनोहर दिवाणे आदी मान्यवर उपस्थित होते. आजपर्यंत सायकल प्रवासाचा दहा हजार किलोमीटरचा टप्पा यशस्वीपणे पार केल्याबद्दल अमेय बारगजे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. एकनाथ उगले यांनी लिहिलेल्या ‘सुवर्ण सुखाचा निरझरू’ या पुस्तकाला विविध पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शरद जालिंद्रे, धनंजय भागवत, रामदास एखे, कैलास एखे,नीलेश धारणकर, अविनाश खोपे, सचिन बिचकर, ओंकार भागवत, लक्ष्मण बोटके, रुपेश साळी, डॉ. मनस्वी धांदल आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विष्णू निचळ यांनी केले. तर किशोर दिवाणे यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.