पिंपरी-चिंचवड

गुन्हे वृत्त

CD

जुन्या भांडणावरून तरुणाला मारहाण

पिंपरी : जुन्या भांडणातून तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना मामुर्डी येथे घडली.
या प्रकरणी कार्तिक श्रीनिवास शिंगाडे (रा. साईनगर, मामुर्डी, देहूरोड) यांनी फिर्यादी दिली आहे. त्यानुसार, योगेश राजू बनपट्टे (वय २५, रा. खराळवाडी, पिंपरी), रोहित जाधव (वय २४, रा. पिंपळे सौदागर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे त्यांच्या दुचाकीवरून साईनगर येथे जात असताना सेंट्रल चौकापासून काही अंतरावर आरोपी योगेश याने जुन्या भांडणाच्या रागातून फिर्यादीला दांडक्याने मारहाण करून जखमी केले. तर रोहित याने हाताने मारहाण केली. तर इतर दोन आरोपींपैकी एकाकडे कोयता होता. त्या दोघांनीही फिर्यादीला मारहाण केली.

वाहनाच्या धडकेत पादचारी गंभीर जखमी
मोशी : भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत पादचारी गंभीर जखमी झाला. हा अपघात मोशी येथे घडला.
महेंद्र मोहनलाल मकवाना (वय ६४) असे जखमी झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. या प्रकरणी कुणाल धीरूभाई हरसूरा (रा. स्पाईन रोड, मोशी प्राधिकरण) यांनी फिर्याद दिली असून अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल झाला आहे. मकवाना हे वॉकिंग करत होते. दरम्यान, सरदार चौकापासून मातेरे हाऊस चौकाकडे जाणाऱ्या भरधाव वाहनाने त्यांना पाठीमागून जोरात धडक दिली. अपघातानंतर वाहन चालक पसार झाला.


शेअर्सच्या व्यवहारात ४६ लाखांची फसवणूक
रावेत : शेअर मार्केटमध्ये शेअर्स व आयपीओ खरेदी-विक्रीचा बहाणा करून जास्त नफ्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची ४६ लाखांची फसवणूक करण्यात आली.
या प्रकरणी पुनावळे येथील ३० वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली असून त्यानुसार काशिका पटियाल या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीने फिर्यादीला शेअर्स व आयपीओ खरेदी-विक्रीतून जास्त नफ्याचे आमिष दाखवले. त्यासाठी शेअर ट्रेडिंगचे एक अॅप इन्स्टॉल करायला लावले. त्याद्वारे वेगवेगळ्या खात्यांवर ४५ लाख ९७ हजार रुपये मागवून फिर्यादीची फसवणूक केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT