पिंपरी-चिंचवड

भोसरीत आढळले कॉलराचे दोन रुग्ण, तिघे संशयित

CD

पिंपरी,ता. ११ : भोसरीतील धावडे वस्तीमध्ये कॉलराचे दोन रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांना यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. याच परिसरात केलेल्या सर्वेक्षणात अन्य तीन संशयित रुग्ण सापडल्याने महापालिका प्रशासन सावध झाले आहे. सर्वेक्षणात अतिसाराचेही रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे, नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात येत आहे.
भोसरीतील धावडे वस्ती येथील रहिवाशाला शनिवारी (ता. ८) अतिसाराचा त्रास सुरू झाल्याने वायसीएम रुग्णालयात भरती करावे लागले होते. सोमवारी (ता. १०) तारखेला अजून एका रहिवाशामध्ये कॉलराची लक्षणे दिसून आली. त्यानंतर, धावडेवस्ती परिसरात महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून सर्वेक्षण सुरू करण्यात आले. या सर्वेक्षणादरम्यान कॉलराचे अन्य तीन संशयित रुग्ण आढळून आले. त्यातील दोघांवर वायसीएम रुग्णालयात; तर एका संशयित रुग्णावर भोसरी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही जणांना अतिसाराचाही त्रास होत असल्याचेही निदर्शनास आले आहे. धावडे वस्तीच्या एकाच भागात कॉलराचे रुग्ण सापडल्याने महापालिका प्रशासन सावध झाले आहे.
ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. ऋतुजा लोखंडे म्हणाल्या,‘‘कॉलरा हा पाण्यातून पसरणारा रोग असल्याने संबंधित रुग्णांच्या घरातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. गेल्या दोन दिवसांत महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून या परिसरातील एक हजाराहून अधिक घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यात रहिवाशांना पाणी उकळून व गाळून पिण्याचे आवाहन करण्यात आले. उलटी, जुलाब यासारखा कोणताही त्रास असल्यास तात्काळ डॉक्टरांना दाखविण्याच्याही सूचना नागरिकांना देण्यात आलेल्या आहेत. भोसरी भागातील खासगी डॉक्टर, महापालिकेचे दवाखाने व रुग्णालयांनाही कॉलराचे संशयित आढळून आल्यास महापालिकेच्या आरोग्य विभागाला कळविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.’’

आकडेवारी
कॉलरा रुग्ण - २
संशयित रुग्ण -३
एकूण घरांचे सर्वेक्षण - १०९०

कॉलराच्या दोन रुग्णांवर वायसीएम येथे उपचार सुरू आहेत. भोसरी विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्यामार्फत त्या भागात सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणात अजून काही रुग्ण अढळून आले; तर त्यांना देखील उपचारासाठी वायसीएम येथे दाखल केले जाईल.
- डॉ. अभय दादेवार, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी, वायसीएम रुग्णालय, पिंपरी

काय आहेत कॉलराची लक्षणे ...
- वारंवार जुलाब व उलट्या होणे
- हदयाचे ठोके वाढणे, रक्तदाब कमी होणे
- तोंडाला कोरड पडणे
- स्‍नायूंमध्‍ये गोळे येणे
- अशक्तपणा जाणवणे, निर्जलीकरण होणे

ही घ्यावी खबरदारी -
- पाणी उकळून प्यावे
- जेवणापूर्वी आपले हात साबणाने स्वच्छ धुणे
- बाहेरील व उघड्यावरील अन्न सेवन करणे टाळावे
- भाजीपाला व फळे स्वच्छ धुवून खावीत
- ताजे व शिजवलेले अन्न खावे, शिळे अन्न खाऊ नये
- वैयक्तिक स्वच्छता राखावी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : जम्मू काश्मीर राज्याला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचा प्रस्ताव कॅबिनेट बैठकीत मंजूर

SCROLL FOR NEXT