सोमेश्वरनगर, ता. २९ ः भविष्यवेधी शिक्षणाचे जागतिक दर्जाचे चार आयाम आहेत. वातावरण बदलाच्या अनुषंगाने उभे राहिलेले प्रश्न, तंत्रज्ञानामुळे निर्माण झालेल्या नव्या समस्या, आंतकवाद व जागतिक आपत्ती या चार आयामांची पूर्तता करणाऱ्या शिक्षण प्रक्रियेला जागतिक दर्जाचे शिक्षण म्हणता येईल. या आयामांची जाण असणारे जागतिक दर्जाचे मूल विकसित करण्याचे काम शिक्षक प्रशिक्षणातून होऊ शकेल, असे मत पुणे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या (डायट) प्राचार्या डॉ. शोभा खंदारे यांनी व्यक्त केले.
पुणे, नगर व सोलापूर जिल्ह्यातील सरकारी व खासगी अनुदानित शाळांमधील निवडक शिक्षकांचे प्रशिक्षण ‘स्टार्स’ प्रकल्पांतर्गत २९ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या कालावधीत लोणावळा (कुसगाव बुद्रूक) येथे सिंहगड सोसायटीच्या सभागृहात होत आहे. यामध्ये अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन व मूल्यमापन या विषयावर प्रशिक्षण देऊन तालुकास्तरीय ‘शिक्षक प्रशिक्षक’ तयार केले जाणार आहेत. शिबिराचे उद्घाटन आज डॉ. शोभा खंदारे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी त्या बोलत होत्या. तर सिंहगड टेक्निकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. मिलिंद रोहकले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी ‘डायट’चे अधिकारी नामदेव शेंडकर, प्रशिक्षण समन्वयक बाळकृष्ण वाटेकर, विकास गरड, डॉ. प्रभाकर क्षीरसागर, प्राची पाटील, वैशाली बच्छाव, राजश्री तिटकारे, योगिता सोनवणे उपस्थित होते.
चौकट ः ४३२ शिबिरार्थी शिक्षक
शिबिरार्थींमध्ये पुणे जिल्ह्यातील १७० शिक्षक व नगर जिल्ह्यातील १३५ शिक्षक तसेच सोलापूर जिल्ह्यातील ११७ शिक्षक पूर्णवेळ निवासी म्हणून हजर आहेत. हे शिबिरार्थी आपापल्या तालुक्यात प्रशिक्षण देणार असून, विद्यापरीषदेचे संचालक अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व खासगी अनुदानित शाळांच्या सर्व शिक्षकांचे प्रशिक्षण डिसेंबरमध्ये होणार आहे, अशी माहिती नामदेव शेंडकर, बाळकृष्ण वाटेकर यांनी दिली.
लोणावळा ः प्रशिक्षण शिबिरात बोलताना डॉ. शोभा खंदारे
फोटोः 03089
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.