पिंपरी-चिंचवड

सोमाटणे, वरसोली टोलनाक्यावर स्थानिक वाहनांना सूट

CD

तळेगाव स्टेशन, ता. ८ : मावळ तालुक्यातील स्थानिक खासगी वाहनधारकांनी आपल्या वाहनाचे आरसी बुक आणि आधारकार्डची प्रत आयआरबी कार्यालयात जाऊन नोंदणी केल्यानंतर एमएच-१४ पासिंगच्या पांढऱ्या नंबरप्लेटच्या खासगी वाहनधारकांना पुणे - मुंबई महामार्ग (एनएच-४) वरील सोमाटणे आणि वरसोली टोलनाक्यावर पथकरातून आता सूट दिली जाणार आहे.
तळेगाव दाभाडे शहरासह मावळातील स्थानिक वाहन धारकांच्या फास्ट स्टॅगमधून सोमाटणे टोलनाक्यावर परस्पर पथकर वजा होत असल्याच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन आमदार सुनील शेळके यांनी येत्या १० तारखेला सोमाटणे टोलनाक्यावरील पथकर वसूली बंद पाडण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर आयआरबीचे मुख्य पथकर अधिकारी नीलेश म्हेत्रे आणि सोमाटणे टोलनाक्याचे व्यवस्थापक महादेव तुपारे यांनी शनिवारी (ता.८) सकाळीच आमदार सुनील शेळके यांच्याशी भेट घेऊन सविस्तर चर्चा करत याबाबत धोरण जाहीर केले. त्याबाबत शेळके आणि अधिकाऱ्यांनी पत्रकारांना माहिती दिली.

केवळ नोंदणीकृत वाहनचालकांनाच सवलत
पथकरातून सूट मिळवण्यासाठी मावळ तालुक्यातील खासगी, पांढऱ्या नंबरप्लेटच्या वाहनधारकांनी सोमाटणे टोलनाक्यावरील आयआरबी कार्यालयात आरसी बुक आणि स्थानिक पत्ता असलेल्या आधारकार्डची प्रत जमा करावी, अशी नोंद करणाऱ्या वाहनचालकांकडून यापुढे पथकर आकारला जाणार नाही, असे आयआरबीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

कपातीचे पैसे पुन्हा खात्यात जमा होणार...
यापूर्वी फास्ट स्टॅगमधून ज्या स्थानिकांचे पैसे कट झालेत. त्यांचे पैसे फास्ट स्टॅग खात्यावर परत जमा होतील. अथवा फास्ट स्टॅगमध्ये स्थानिक पर्याय कार्यान्वित केल्यास केवळ १० रुपये वजा होऊ शकतील. स्थानिक असल्याच्या पुराव्याची नोंद केल्यानंतर तेही परत जमा होतील. याशिवाय पिवळ्या नंबर प्लेटच्या हलक्या, जड आणि अवजड दर्जाच्या स्थानिक वाणिज्यिक वाहनांसाठी ५० टक्के सूट मासिक पासवर उपलब्ध आहे.
- नीलेश म्हेत्रे, मुख्य पथकर अधिकारी, आयआरबी

मावळ तालुक्यातील स्थानिक खासगी वाहनचालकांनी ३० जूनपर्यंत आयआरबीच्या सोमाटणे टोलनाक्यावरील कार्यालयात आपली नोंद करून टोल सवलतीचा लाभ घ्यावा. देहूरोड ते लोणावळा दरम्यानच्या मावळ तालुक्यातील स्थानिक वाहनधारकांना टोलमधून सूट देण्यासाठी आपण सदा प्रयत्नशील राहू.
- आमदार सुनील शेळके

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT