पिंपरी-चिंचवड

सफाई कर्मचाऱ्यांसाठी क्षमता बांधणी प्रशिक्षण

CD

वडगाव मावळ, ता. ४ : वडगाव नगरपंचायतीच्या वतीने स्वच्छ भारत अभियानांतर्गत सफाई कर्मचाऱ्यांसाठी क्षमता बांधणी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
स्वच्छ भारत अभियान हा केंद्र व राज्य शासनाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम असून, स्वच्छ भारत अभियान २.०ची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी यासाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सर्व कामगारांची क्षमता बांधणी होणे अत्यावश्यक आहे. आवश्यक त्या सुविधा, घनकचरा व मैला व्यवस्थापन संबंधित कर्मचारी यांची क्षमता बांधणी करणे आवश्यक आहे. क्षमता बांधणीच्या अनुषंगाने राज्य अभियान संचालनालय, स्वच्छ महाराष्ट्र अभियान यांच्याकडून मुख्याधिकारी, तांत्रिक कर्मचारी व सफाई कर्मचारी वर्ग या तीन स्तरावर कार्यशाळा घेण्यात आल्या आहेत. त्याच अनुषंगाने वडगाव नगरपंचायतीच्या वतीने बुधवारी नगरपंचायत सभागृहामध्ये राज्य अभियान संचालनालय, स्वच्छ महाराष्ट्र अभियान यांच्यामार्फत कुशाग्रा इनोवेशन फाउंडेशन, पुणे यांनी नगरपंचायतीच्या सर्व सफाई कर्मचाऱ्यांची कार्यशाळा घेऊन त्यांना प्रशिक्षण दिले. सफाई कर्मचाऱ्यांना कामाचे स्वरूप व आवश्यक संसाधने, नागरिकांशी संवाद, आरोग्य व विविध योजनांबाबत पूरक माहिती अशा गोष्टींची क्षमता बांधणी करून घेण्यात आली. मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT