Hinjewadi Encroachment Sakal
पिंपरी-चिंचवड

Hinjewadi : हिंजवडी-वाकड रस्त्यावरील पदपथाने घेतला मोकळा श्वास; शंभरहुन अधिक विक्रेत्यांना हटविले

पादचाऱ्यांसाठी असणारे पदपथ गिळंकृत करणाऱ्या तब्बल शंभरहुन अधिक विविध व्यावसायिकावर गुरुवारी (ता. ११) हिंजवडी वाहतूक पोलिसांनी कारवाई करत त्यांना हटविले.

सकाळ वृत्तसेवा

पादचाऱ्यांसाठी असणारे पदपथ गिळंकृत करणाऱ्या तब्बल शंभरहुन अधिक विविध व्यावसायिकावर गुरुवारी (ता. ११) हिंजवडी वाहतूक पोलिसांनी कारवाई करत त्यांना हटविले.

हिंजवडी - निमुळते अन ओसंडुन वाहणारे रस्ते असे चित्र सध्या हिंजवडीत असताना पादचाऱ्यांसाठी असणारे पदपथ गिळंकृत करणाऱ्या तब्बल शंभरहुन अधिक विविध व्यावसायिकावर गुरुवारी (ता. ११) हिंजवडी वाहतूक पोलिसांनी कारवाई करत त्यांना हटविले. त्यामुळे पदपथाने मोकळा श्वास घेतला तर पादचाऱ्यांचीही मोठी गैरसोय दूर झाली आहे.

हिंजवडी मेट्रो मार्गाचे काम सुरू आहे. त्याचा परिणाम वाहतूकीवर होत आहे. सर्व रस्ते कोंडीने भरत असल्याने पाय ठेवायलाही जागा उरत नाही. त्यातच पदपथावर विविध विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याने जीव मुठीत धरून पादचाऱ्यांना ये-जा करावी लागत असे. त्यामुळे अनेकदा हिंजवडी वाहतूक विभागाने या विक्रेत्यांना सूचना केल्या होत्या. तरीही काहीच बदल न झाल्याने शुक्रवारी अकरा वाजता कारवाई करण्यात आली. त्यांचे साहित्य काढून त्यांनाच परत दिले गेले. तरीही पुन्हा अतिक्रमण केल्यास थेट गुन्हे दाखल करणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांनी सांगितले.

हिंजवडी शिवाजी महाराज चौक ते वाकड नाक्यापर्यंत फूटपाथवर असलेले अतिक्रमण काढण्यात आले. हिंजवडी वाहतूक विभागाचे प्रमुख विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दिलीप लोखंडे, स्वामी होनकळस, रोहिदास बोऱ्हाडे, अमोल पवार, जगदिश भामरे, भाऊसाहेब सानप व अधिकारी, अमलदार व चार वॉर्डन यांच्या मदतीने ही कायदेशीर कारवाई करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Champions Trophy पाकिस्तानमध्येच होणार, मागे हटणार नाही! PCB प्रमुखांचं रोखठोक मत; पाहा Video

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Maharashtra Election 2024 : उल्हासनगर परिमंडळातील 8 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत 24 ड्रोनचा वॉच, मतदान प्रक्रियेसाठी कंबर कसली

Leopard Attack : चिमुकल्याच्या मृत्यूमुळे आई-वडिलांचा टाहो; एका महिन्यात तीन बळी

Sanapwadi Village Voting : स्वातंत्र्याच्या सत्त्याहत्तर वर्षानंतर प्रथमच सानपवाडीकर करणार स्वतःच्या गावांत विधानसभेसाठी मतदान

SCROLL FOR NEXT