लोणावळा : पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर शनिवार (ता.१०) घात वार, द्रुतगती मार्गावर नवीन अमृतांजन पुल आणि खोपोली फुडमाॅलजवळ आज सकाळी झालेल्या दोन दुदैवी अपघातांमध्ये दोघांना आपला जीव गमवावा लागला आहे.
पुण्यात IAS अधिकारी सुधाकर शिंदे यांचे वयाच्या 34 व्या वर्षी निधन
पहिल्या घटनेत द्रुतगती मार्गावर नवीन अमृतांजन पुलाखाली साखरेच्या गोण्यांनी भरलेला भरधाव ट्रक उलटल्याने झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य एक जण जखमी झाला. खंडाळा बोगद्यापुढील तीव्र उतार आणि नवीन अमृतांजन पुलाजवळील वळणावर अती वेगामुळे ट्रकचे (केए २८ डी ५१९६) ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात झाला असण्याची शक्यता महामार्ग पोलिसांनी व्यक्त केली. ट्रक पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात होता. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्यालगत कठड्यास धडकत द्रुतगतीवरील एका लेनवर आडवा झाला. साखरेच्या गोण्यांखाली दबल्याने एकाचा जागीच मृत्यु झाला. मृताचे नाव समजू शकले नाही. तीन अवजड क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त ट्रक बाजूला करत वाहतुक सुरळीत केली.
हेही वाचा - भाजपशी जवळीकता नडली; काँग्रेस आमदाराची पक्षातून हकालपट्टी
दुसऱ्या घटनेत खापोली हद्दीत आज सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास फुडमाॅलजवळील तीव्र उतारावर ट्रकने कंटेनरला मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकाचा दुदैवी मृत्यु झाला. अपघाताची माहिती समजताच आयआरबी कंपनीचे कर्मचारी, देवदूत पथक व महामार्ग पोलिस घटनास्थळी दाखल होत झाले. यादरम्यान वाहतुक काही काळ विस्कळीत झाली. मृताची ओळख पटविण्याचे काम सुरु असून दोन्ही घटनांचा तपास खोपोली पोलिस करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.