लोणावळा - लोणावळ्यात वर्षाविहारासाठी आलेल्या मुंबईतील दोन तरुणांचा वरसोली येथील दगडाच्या खाणीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. प्रियांक पानचंद व्होरा (वय ३५, रा. पवई, मुंबई), विजय सुभाष यादव (वय ३५, रा. घाटकोपर, मुंबई) बुडालेल्या तरुणांची नावे आहेत. तर त्यांची मैत्रीण झेनिया वियागत (वय २९, रा. मुलुंड, ठाणे) या तरुणीला वाचविण्यात यश आले. शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली.
खाणीतील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे हे दोघे बुडाले असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियांक, विजय आणि झेनिया यांच्यासह सहा तरुण-तरुणी शनिवारी दुपारी लोणावळ्यात वर्षाविहाराला आले होते. त्यांनी वरसोलीत बंगला भाड्याने घेतला होता.
सायंकाळी ते सर्वजण बंगल्याच्या मागील बाजूस असलेल्या डोंगराच्या पायथ्याजवळील एका दगडाच्या खाणीकडे फिरायला गेले होते. यावेळी ते दगडाच्या खाणीतील पाण्यात पोहण्यासाठी उतरले असता पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडाले. या प्रकरणी अधिक तपास लोणावळा ग्रामीण पोलिस करीत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.