वाहनांची तोडफोड करीत माजवली दहशत  sakal
पिंपरी-चिंचवड

टोळक्याकडून वाहनांची तोडफोड; पाच अल्पवयीन मुलांवर गुन्हा

शहरात गुन्ह्याचे वृत्त सुरुच असून, पाच अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

सकाळ डिजिटल टीम

पिंपरी: एका महिलेसोबत असलेल्या जुन्या भांडणाच्या कारणावरून पाच अल्पवयीन मुलांच्या टोळक्याने कोयत्याने वाहनांची तोडफोड केली. ही घटना चिंचवडमधील अजंठानगर येथे घडली. याप्रकरणी संतोष दत्तात्रेय भिसे (रा. अमृतानंदन सोसायटी, अजंठानगर, चिंचवड) यांनी या बाबत निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पाच अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल झाला आहे.

एका अल्पवयीन मुलांचे एका महिलेशी काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. या कारणावरून अल्पवयीन मुलाचे साथीदार शुक्रवारी (ता. १९) सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास अजंठानगर येथे हातात कोयता घेऊन आले. त्यांनी फिर्यादी यांच्यासह सूरज साहेबराव धावारे यांच्या दुचाकीची तोडफोड करून दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. त्यानंतर एका महिलेच्या कार्यालयावर दगड व कोयता मारला. निगडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

तरुणाला मारहाण; एकावर गुन्हा

किरकोळ कारणावरून तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना बोपखेलमधील रामनगर येथे घडली. आकाश मुकेश ढिलारे (वय १९, रा. रामनगर, बोपखेल) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याबाबत भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यानुसार संदीप प्रदीप जिनवाल (रा. बोपखेल) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

फिर्यादी हे बुधवारी (ता. १८) सकाळी दहाच्या सुमारास त्यांच्या घराजवळ उभे होते. त्यावेळी आरोपी तिथे आला. ‘तू बस स्टॉपला व चौकात बसायचे नाही. तुला दाखवू का’ असे म्हणत फिर्यादी यांना मारहाण केली. यामध्ये ते जखमी झाले. भोसरी पोलिस अधिक तपास करीत आहे.

महिलेची दीड लाखांची फसवणूक :

केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने एका महिलेची दीड लाख रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार पिंपरी येथे घडला. याप्रकरणी पीडित महिलेने पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांना आरोपीने केवायसी अपडेट करण्याबाबत मेसेज करून केवायसी अपडेट न केल्यास तुमचे अकाउंट रद्द करण्यात येईल असे सांगितले.

तसेच त्यांना मेसेज द्वारे लिंक पाठवली. त्यानंतर पुन्हा फिर्यादी यांना फोन केला. ‘मी एसबीआय बँकेतून बोलत आहे. आपल्याला इंटरनेट बँकिंग करत असताना ओटीपी सेंड होत नाही, असे आम्हाला समजले आहे. तुम्हाला केवायसी बाबत आलेल्या मेसेज मधील लिंकवर क्लिक करून तुम्ही तुमच्या तक्रारीचे निवारण करू शकता’, असे सांगितले.

त्यानुसार फिर्यादीने त्यांना आलेल्या मेसेजमधील लिंकवर क्लिक केले. त्यानंतर फिर्यादीच्या एसबीआय बँकेच्या चाकण शाखेतील खात्यामधून एक लाख ५७ हजार ६९९ रुपये आरोपींनी ऑनलाइन ट्रान्स्फर करून घेतले. पिंपरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू :

भरधाव वाहनाने जोरात धडक दिल्याने पादचाऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना पुनावळे येथे मुंबई-बंगलोर महामार्गावर पवना नदीवरील पुलावर घडली. संदीप अशोक मोटे (वय ३८) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी त्यांचा चुलत भाऊ ओंकार मनोहर मोटे (रा. पुनावळे) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल झाला आहे. मृत संदीप मोटे हे नेहमीप्रमाणे गुरुवारी (ता. १९) सकाळी आठच्या सुमारास ते मुंबई बंगलोर महामार्गावरून पायी जात असताना पवना नदीवरील ब्रिजवर त्यांना भरधाव आलेल्या अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या संदीप यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर आरोपी वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाला.

चिंचवडमध्ये बॅगेतून सोनसाखळी चोरीला :

महिलेकडील बॅगेतील पाकीटामध्ये ठेवलेली ४५ हजार रुपये किमतीची सोनसाखळी चोरट्यांनी चोरले. या प्रकरणी महिलेने चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला बुधवारी (ता. १८) दुपारी सव्वाबाराच्या सुमारास निगडी बसस्टॉप येथून बसने चापेकर चौक येथे गेल्या.

त्यांनी त्यांच्याकडील बॅगेतील पाकिटात सोनसाखळी ठेवली होती. चिंचवड गावातील एका दुकानात जात असताना बॅगेतील पाकीट चोरीला गेल्याचे लक्षात आले. चिंचवड पोलिस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur North Assembly Election 2024 Results : 'कोल्हापूर उत्तर'मधून राजेश क्षीरसागर तब्बल 30 हजार मतांनी विजयी; लाटकरांचा केला पराभव

karmala Assembly Election 2024 Result Live: करमाळ्यात नारायण आबा पाटील यांचा विजय, संजयमामा शिंदे यांना धोबीपछाड, बागल गटाचे अस्तित्व धोक्यात

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: राज ठाकरेंना मोठा धक्का, अमित ठाकरे पडले

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीचे नेते पत्रकार परिषद घेणार

Jaykumar Gore won Man Assembly Election 2024 Result: जयाभाऊचा विजयाचा चाैकार! माण-खटावमध्ये प्रभाकर घार्गे यांचा माेठा पराभव

SCROLL FOR NEXT