vehicle glass clean on road beggar children sakal
पिंपरी-चिंचवड

Moshi News : मोटारींच्या काचा पुसत भीक मागण्याचा फंडा; कारवाई करण्याची वाहनचालकांची मागणी

सिग्नलवर मोटारीच्या काचेवर बाटलीतील साबणाच्या पाण्याची पिचकारी मारून ती काच पुसण्याच्या बहाण्याने भिकाऱ्यांनी आता भीक मागण्याचा नवीन फंडा सुरू केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

मोशी - सिग्नलवर मोटारीच्या काचेवर बाटलीतील साबणाच्या पाण्याची पिचकारी मारून ती काच पुसण्याच्या बहाण्याने भिकाऱ्यांनी आता भीक मागण्याचा नवीन फंडा सुरू केला आहे. मोशीतील राजा शिवछत्रपती चौकात हा प्रकार घडत आहे. त्यामुळे, या भिकाऱ्यांना आवरण्याची मागणी वाहनचालकांनी केली आहे.

आपल्याला आता कोणी भीक देत नाहीत. हे ओळखून काही भिकाऱ्यांनी छत्र्या, पेन, रुमाल अशा विविध वस्तू विकणे तसेच मोटारीच्या काचा पुसण्याच्या नावाखाली पुणे-नाशिक महार्मावर मोशीतील राजा शिवछत्रपती चौक अतिशय वर्दळीचा असून त्याच्या सिग्नलवर भिकाऱ्यांनी उच्छाद मांडला आहे. विशेष म्हणजे भीक न दिल्यास गाडीवर चरे पाडणे, विचित्र हावभाव व शिवीगाळ करण्यापर्यंत त्यांची मजल जात असल्याचे वाहनचालक हृषीकेश पवार, मीनल चव्हाण, सागर पाटील, दिगंबर गरुड आदींनी सांगितले.

काचा पुसणाऱ्यांची संख्या अधिक

राजा शिवछत्रपती चौकातील सिग्नलवर वाहनांच्या काचा पुसणाऱ्या भिकाऱ्यांची संख्या अधिक आहे. भिक्षा मागण्याच्या निमित्ताने लहान मुलांना पुढे केले जाते. सिग्नल बंद होताच ही मुले गाडीजवळ येऊन चालकाला न विचारताच गाडीच्या पुढील काचेवर बाटलीतील निकृष्‍ट दर्जाच्या साबणाच्या पाण्याची पिचकारी मारतात. दांडीला लावलेल्या स्पंजने अर्ध्याच काचेवर पुसल्यासारखे करतात. काही सेकंदात हे काम झाल्यावर चालकाकडे भीक मागितली जाते. न दिल्यास वेळप्रसंगी काचांवर मारणे, ओरखडे ओढण्याचे प्रकार केले जातात. काहीजण पेन, रुमाल, कचऱ्याच्या पिशव्या विकण्याच्या निमित्ताने गाडीजवळ येऊन भिक्षा मागतात.

कामासाठी दररोज भोसरी ते चाकण प्रवास असा करावा लागतो. पुणे-नाशिक महामार्गावरील राजा शिवछत्रपती (जुना वखार महामंडळ चौक) चौकातील सिग्नलवर काचा पुसून भीक मागणाऱ्या लहान मुलांसह महिलांचीही संख्या मोठी आहे. ही मुले वाहनांच्या वेगाबाबत गंभीर नसल्याने वाहनांच्या काचा पुसून पैसे मिळविण्यासाठी ते तुटून पडतात. प्रसंगी तर वाहनाच्या चाकावर चढून काच पुसत किमान दहा ते वीस रुपये मागतात. यावेळी जर वाहन चालकाचे लक्ष नसेल; तर अपघाताची शक्यता वाढते.

- विकास भोसले, वाहनचालक

राजा शिवछत्रपती चौकात मोटारींच्या काचा पुसण्याच्या बहाण्याने भीक मागण्याचा हा प्रकार नक्कीच चुकीचा व अपघातास निमंत्रण देणारा आहे. हा प्रकार थांबविण्यासाठी तात्काळ कार्यवाही केली जाईल.

- गणेश जामदार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, एमआयडीसी पोलिस ठाणे, मोशी प्राधिकरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बुरखा घातल्याने 'मोदीं'च्या सभेत प्रवेश नाकारला; मुस्लीम महिलांनी घेतली आक्रमक भूमिका, शिवाजी पार्कवर काय घडलं?

Lok Poll Survey: मविआला स्पष्ट बहुमत! महायुतीच्या पारड्यात ‘इतक्या’ जागा; लोकपोलचा निवडणूकपूर्व सर्व्हे काय सांगतोय?

Narendra Modi: पंतप्रधान पदासाठी नावाची घोषणा; मोदींनी सांगितली, रायगडावरची 'ती' खास आठवण

Late Sleeping Side Effects : रात्री १२ नंतर झोपत असाल तर सावध व्हा, वेळीच सवय बदला नाहीतर महागात पडेल!

Fact Check : वायनाड रोड शो मधील राहुल गांधींच्या T-Shirt वरील "I love Nafrat ki Dukan" स्लोगन खोटा, जाणून घ्या व्हायरल पोस्ट मागील सत्य

SCROLL FOR NEXT