Wakad Police Life Saving Citizens in Flood water sakal
पिंपरी-चिंचवड

Wakad Hinjewadi Rain Update : वाकड-हिंजवडीतील अनेक रस्त्यावर पाणीच पाणी; आयटीतील वाहतूक मंदावली

वाकड गावठाणालगतच्या मुळा नदीला पुर आला आहे. नदी पात्र भरून वाहत असून इतक्या वर्षांनी म्हातोबा मंदिराच्या पायरी पर्यंत पाणी आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

वाकड/हिंजवडी - आठवडाभर झालेल्या तुरळक पावसाने आयटी पार्क हिंजवडीतील व आयटीकडे जाणाऱ्या बहुतेक रस्त्यांची तसेच वाकड, ताथवडे, पुनावळेतील सेवा रस्त्यांची पूरती चाळण केली.

या रस्त्यांवर खड्ड्याचे साम्राज्य पसरल्याने अगोदरच वाहतूक कोंडीने सर्वजण हैराण असताना दोन दिवस पावसाने कहर केला त्यामुळे वाकड व आयटी पार्क हिंजवडीतील अनेक रस्ते जलमय झाले. त्याचा परिणाम आयटीतील वाहतुकीवर मोठ्या प्रमाणावर झाला. बहुतेक रस्त्यावर सकाळपासून वाहतूक मंदावली होती.

Wakad Police

मुंबई बंगळुरु महामार्गाखालील भुमकर वस्ती अंडरपासमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी तुंबल्याने वाहने सावकाश पुढे जात असल्याने थोडी कोंडी झाली होती. वाहतूक पोलिसांनी येथील वाहतूकीचे नियमन केले. तर दुपारी बाराच्या सुमारास महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी ड्रेनेज लाईनचे चोकोअप काढल्याने पाणी वाहून गेले. त्यामुळे विना अडथळा वाहतूक सुरु झाली.

वाकड गावठाणालगतच्या मुळा नदीला देखील पुर आला आहे. नदी पात्र भरून वाहत असून इतक्या वर्षांनी म्हातोबा मंदिराच्या पायरी पर्यंत पाणी आले आहे. लगतच्या संत सावता माळी उद्यानातही पाणी गेले आहे.

ताथवडे येथील डी वाय पाटील कॉलेज समोरील सेवा रस्त्यावर गुडघाभर पाणी साठल्याने वाहन चालकांची मोठी कसरत करावी लागली. ताथवडे चौकातील भुयारी मार्ग पाण्याने तुडुंब भरला होता. त्यामुळे अनेकांना मोठा वळसा मारुन इच्छितस्थळी जावे लागले. काळाखडक गणेश नगर रस्त्यावर जणू नदी अवतरल्याचे चित्र होते. सुमारे सहा फूट पाणी तुंबले होते. यातून जाताना अनेक मालवाहू वाहने पाण्यात बंद पडल्याने रस्ताच बंद झाला आहे.

माण-बोडके वाडी रस्ता पाण्याखाली गेल्याने हिंजवडी फेज एककडून माणकडे जाणारी वाहतुक अनेक तास खोळंबली. फेज दोन येथील डोंगरावरून येणारे पाणी थेट रस्त्यावर मोठ्या प्रमाणात साठल्याने वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागला.

काळेवाडीतील इंडियन कॉलनीत पवना नदीचे पाणी शिरले. घरात पाणी गेलेल्या सुमारे तीनशे कुंटुबातील सहाशे ते सातशे नागरिकांना वाकड पोलीस व स्थानिक नागरिकांच्या मदतीने सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. यावेळी पोलीस उपायुक्त बापू बांगर, सहाय्यक आयुक्त सुनील कुऱ्हाडे व वाकडचे वरिष्ठ निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर हे स्वतः मदत कार्यात सहभागी झाले होते.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे पूरग्रस्तांसाठी राहण्याची व्यवस्था केलेली आहे. कमला नेहरू हिंदी विद्यालय पिंपरी, विवेकानंद बॉक्सिंग हॉल, संजय गांधी नगर पिंपरी, रहाटणी पीसीएमसी स्कूल, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पाठीमागे रहाटणी, यशवंतराव चव्हाण प्राथमिक विद्यालय, थेरगाव गावठाण, वाल्मीक आश्रम मिलिंद नगर पिंपरी इत्यादी शाळात तात्पुरती राहण्याची सोय करण्यात आली आहे.

येथील आयाप्पा मंदिर पाण्यात गेले असून ज्योतीबा उद्यानाताही पाणी शिरले. नदी काठच्या पवना नगरालाही मोठा तडाका बसला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT