पिंपरी-चिंचवड

Wakad News : वाकड फाट्यावर झिंगणाऱ्या मद्यपींच्या धांगडधिंग्याने नागरिकांचे स्वागत; पोलीस व महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

अतिशय वर्दळ व दाट लोकवस्तीच्या वाकड फाटा रस्त्यावर पाऊल ठेवताच किळसवाण्या व लाजिरवाण्या प्रकाराने सर्वांचे स्वागत होतं आहे.

सकाळ वृत्तसेवा

- बेलाजी पात्रे

वाकड - अतिशय वर्दळ व दाट लोकवस्तीच्या वाकड फाटा रस्त्यावर पाऊल ठेवताच किळसवाण्या व लाजिरवाण्या प्रकाराने सर्वांचे स्वागत होतं आहे. मद्यपींची सोय म्हणून ह्या चौकात देशी-विदेशी मद्याचे तीन-चार बार थाटले गेले त्यामुळे शुद्ध हरपलेल्या मद्यपींचा दिवसभर हैदोस सुरु असतो मात्र या सर्वांचा नाहक त्रास शुद्धीत असलेल्या नागरिकांना वर्षभरापासून सहन करावा लागत आहे. याकडे पोलीस अन महापालिका प्रशासनाने उघड्या डोळ्याने पाहण्याची गरज असल्याची जोरदार चर्चा आहे.

रस्ता तसा स्मार्ट, प्रशस्त व मुख्य चौक. मात्र, त्या रस्त्यावर खरखटे अन्न, तेलकट सांडपाण्याचे मोठाले ओघळ, पदपथ आणि निम्म्याहून अधिक रस्ता व्यापलेली आडवी-तीडवी मद्यपींची वाहने, भर रस्त्यातच मद्यपींचा धांगडधिंगाणा, आरडा-ओरड, थील्लरबाजी अशा लज्जास्पद परस्थितीने डांगे चौक वाकड फाट्यावर नशापाणी न करता शुद्धीत ये-जा करणाऱ्याांना त्रास होत आहे. येथून ये-जा करणाऱ्या महिला, तरुणी, विद्यार्थी व नागरिक त्रस्त झाले आहेत.

बारचालक प्लस्टिक ग्लास, बॉटल घाणघुन, कचरा व राडारोडा उद्दामपणे रस्त्यावर टाकतात. खरखट्या पाण्यामुळे रस्ता निसरडा झाला असून दररोज अनेक वाहने अपघातग्रस्त होत आहेत. मुख्य चौक व पीएमपीचा बस थांबा असल्याने येथून विद्यार्थी, महाविद्यालयीन, नोकरदार तरुणी, महिलांचा वावर अधिक असतो या सर्वांना मद्यपींच्या हुल्लडबाजीचा व अश्लील शेरेबाजीचा सामना करत मान खाली घालून नाईलाजाने ये-जा करावी लागते.

विशेष म्हणजे हाकेच्या अंतरावर आरोग्य विभागाचे कार्यालय व वाकड पोलीस ठाणे आहे. असे असूनही मनमानी करणाऱ्या उद्दाम बारचालकांना शिस्त लावण्यात पोलीस असमर्थ ठरत असल्याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.

प्रतिक्रिया

गणेश नगर, मंगल नगर, वाकड रस्ता हा परिसर नोकरदार, सुशिक्षित व गुणवंत रहिवाशांच्या वास्त्यव्यासाठी प्रसिद्ध आहे. अनेक रहिवाशी कॉलन्या व सोसायट्यांचा हा शांत परिसर आहे. येथे अनेक मोठाल्या शाळा देखील आहेत. मात्र आता शांतता भंग पावत असून डुलणाऱ्या मद्यपींमुळे सर्वांनाच ये-जा करणे अवघड झाले आहे. पोलिसांनी योग्य ती खबरदारी घ्यावी.

- एक रहिवाशी

अशा आस्थापनांचा सार्वजनिक ठिकाणच्या शांततेला बाधा पोहचता कामा नये, सर्व सामान्य नागरिकांना त्यांचा कुठल्याही प्रकारचा त्रास होत असेल तर संबंधित वाकड पोलीस ठाण्याच्या टीमला या प्रकाराची पाहणी करायला सांगून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेश दिले जातील

- बापू बांगर, पोलीस उप आयुक्त

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता केल्यास सुरुवातीला त्यांना समज दिला जातो तरीही बदल न झाल्यास नोटीस दिली जाते. त्यानंतर दांडात्मक कारवाई करण्याची तरतूद आहे. वाकड फाटयावर आमच्या टीमने आजवर काय कारवाई केली याची माहिती घेतली जाईल तसेच येथील परस्थितीचा आढावा घेऊन नोटीस बजावली जाईल.

- कुंडलिक दरोडे, सहायक आरोग्य अधिकारी, पिंपरी-चिंचवड महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT