Nisha Prabhu sakal
पिंपरी-चिंचवड

Wakad News : सामाजिक बांधिलकीतून कॅन्सरग्रस्तांसाठी महिलेचे केशदान; थेरगावातील निशा प्रभु यांचे दातृत्व

सकाळ वृत्तसेवा

- बेलाजी पात्रे

वाकड - लांबसडक केस म्हणजे महिलांचा दागिना होय. त्यांच्या सौंदर्यात केस भर घालतात. त्यांच्यासाठी जीव की प्राण असलेल्या केसांची निगा राखण्यासाठी महिला वाट्टेल ते करायला तयार असतात. असे असताना थेरगाव सोशल फाऊंडेशन व अखिल गणेशनगर प्रतिष्ठाण या सामाजिक संस्थांच्या माध्यमातुन सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या निशा प्रभु यांनी जीवापाड प्रेम असलेले केस कॅन्सरग्रस्तांसाठी दान करून दातृत्वाचा अनोखा आदर्श समाजाला घालून दिला आहे.

सामाजिक बांधिलकीतून निशा प्रभू यांनी आपल्या लांबसडक केसांचा त्याग केलाय. कॅन्सर झालेल्या महिलांचे केमोथेरेपीमुळे केस गळतात. डोक्यावर टक्कल पडल्यानं महिलांच्या सामाजिक वावरावर मर्यादा येतात. डोक्यावर केस नसल्याने कृरूप दिसत व आजारी परिस्थितित समाजात कसे वावरायचे? लोक काय म्हणतील? असे प्रश्न त्यांना सतावतात यातून अशा महिलांचा आत्मविश्वास हरवतो. अशा रुग्णांचा आत्मविश्वास वाढविण्यास काहीतरी मदत व्हावी म्हणून निशा यांनी मदत ट्रस्ट या संस्थेला केशदान करण्याचा निर्णय घेतला.

मुंबईतील मदत ट्रस्ट ही संस्था खास कर्करोगावर उपचार प्रदान करत असलेल्या टाटा हॉस्पिटलशी संलग्न राहुन आपण दान केलेल्या केसांचा वापर टोप (विग) बनवण्यासाठी करते आणि ते विग जे रुग्ण त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे ते खरेदी किंवा विकत घेऊ शकत नाहीत अशा कर्करोगाशी लढत असलेल्या रुग्णांना मोफत देते. निशा यांनी नुकतेच या संस्थेला केस कुरियरने पाठविले.

मृत्यूनंतर आपण अवयव दान करू शकतो, पण जिवंतपणी आपण 'रक्तदान व केशदान करू शकतो, कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी केशदान ही संकल्पना समाजात फारशी रुजलेली नाही याच विचारातुन मी जनजागृती म्हणून केसदान केले. आपणही थेरगाव सोशल फाऊंडेशन मार्फत केसदान चळवळीचा भाग होऊ शकता.

- निशा प्रभू (केशदात्या, सामाजिक कार्यकर्त्या)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT