Pawana-Dam sakal
पिंपरी-चिंचवड

Water Reduction : पिंपरी-चिंचवडकरांना दिलासा! पाणीकपातीचे संकट टळले; पवना धरण ८७ टक्के भरले

गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पवना धरण मंगळवारी (ता. ३०) सायंकाळी सहापर्यंत ८७.१५ टक्के भरले आहे.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पवना धरण मंगळवारी (ता. ३०) सायंकाळी सहापर्यंत ८७.१५ टक्के भरले आहे. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी ३० जुलैचा पाणीसाठा विचारात घेतला जातो. पुढील वर्षी ३० जुलैपर्यंत पाणी पुरेल इतका साठा सध्या धरणात असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत तीन टक्क्यांनी अधिक आहे. त्यामुळे शहराची पाण्याची चिंता मिटली आहे.

मावळ तालुक्यातील पवना धरण व आंद्रा धरणातून शहराला पाणीपुरवठा केला जात आहे. खेड तालुक्यातील भामा-आसखेड धरणातूनही प्रतिदिन १६७ दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणीसाठा मंजूर आहे. त्याअंतर्गत जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. आंद्रा धरणातील प्रतिदिन ८५ ते ९० एमएलडी पाणी इंद्रायणी नदीवरील निघोजे येथील बंधाऱ्यातून उचलले जात आहे.

त्यांवर चिखली जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करून चिखली, मोशी, डुडुळगाव, चऱ्होली, दिघी, भोसरी परिसरात वितरित केले जात आहे. तर, पवना नदीवरील रावेत बंधाऱ्यातून प्रतिदिन ५१० एमएलडी अशुद्ध जलउपसा केला जात आहे. त्यावर प्राधिकरण सेक्टर २३ मधील जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करून वितरित केले जात आहे. शिवाय ‘एमआयडीसी’कडून प्रतिदिन ३० एमएलडी पाणी महापालिका घेत आहे.

पावसामुळे दिलासा

लांबलेला पावसाळा, जूनसह जुलै महिन्याचे पहिले दोन आठवडे पावसाने दडी मारली होती. मात्र, २० जुलैनंतर धरण क्षेत्रासह घाटमाथा व मावळ तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे तीनच दिवसात धरणसाठ्यात झपाट्याने वाढ झाली. पावसाचा जोर कमी झाल्यानंतरही पाणीसाठ्यात वाढ होत असल्याने दिलासा मिळाला आहे.

धरणातील ३० जुलैचा पाणीसाठा

तपशील - २०२३ -२०२४

पाणीपातळी (मीटर) - ६११.४९ - ६११.७६८२

एकूण पाणीसाठा (दशलक्ष घनमीटर) - २३३.५६ - २४१.१६

उपयुक्त पाणीसाठा (घनमीटर) - २०२.४२ - २१०.०१

पाणीसाठा (टक्के) - ८३.९९ - ८७.१५

पिंपरी-चिंचवडला जुलैअखेरपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा गृहीत धरला जातो. जुलैअखेरपर्यंत झालेल्या पावसामुळे धरण साठ्यात वाढ होत असते. धरण ८७.१५ टक्के भरले आहे. पावसाळा लांबल्यास साठा विचारात घेऊन पाण्याचे नियोजन केले जाते.

- समीर मोरे, अभियंता, पवना धरण

दृष्टिक्षेपात धरण

  • पवना धरण पाणी क्षमता (मीटरमध्ये) - ६१३.२६

  • उपयुक्त साठा (दशलक्ष घनमीटर) - २४०.१७

  • अचल साठा (दशलक्ष घनमीटर) - ३१.१५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: ‘सकाळ’च्या डिजिटल पानाचा गैरवापर; एकावर गुन्हा दाखल, निवडणूक प्रचाराबाबतच्या खोडसाळपणाची पोलिसांकडून गांभीर्याने दखल

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश! इलेक्शन ड्युटी नाकारणाऱ्या १३४ कर्मचाऱ्यांवर दाखल होणार गुन्हे; ‘या’ ८ मतदारसंघातील आहेत कर्मचारी

Pune News : राहुल गांधी यांनी दोन डिसेंबरला न्यायालयात हजर राहावे; पुणे प्रथमवर्ग न्यायालयाचा आदेश

Pune News : मविआच्या काळात महाराष्ट्राच्या विकासाचा वेग मंदावला; केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत

IPL Auction साठी पर्थ कसोटीवेळीच 'हा' कोच संघाला सोडणार अन् ऑस्ट्रेलियातून सौदी अरेबियात पोहचणार

SCROLL FOR NEXT