Temperature sakal
पिंपरी-चिंचवड

Summer Heat : बदलत्या वातावरणामुळे अशक्तपणा, डोकेदुखीत वाढ! घराबाहेर पडणे टाळण्याचा सल्ला

गेल्या काही दिवसांपासून सकाळी, रात्री थंडी आणि दुपारी कडक ऊन अशा दोन वेगवेगळ्या ऋतूंच्या विचित्र बदलत्या वातावरणाचा अनुभव पिंपरी-चिंचवडकर घेत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - गेल्या काही दिवसांपासून सकाळी, रात्री थंडी आणि दुपारी कडक ऊन अशा दोन वेगवेगळ्या ऋतूंच्या विचित्र बदलत्या वातावरणाचा अनुभव पिंपरी-चिंचवडकर घेत आहेत. त्यामुळे, सर्दी, खोकला, घसादुखी, जुलाब, उलट्या, अशक्तपणा आणि डोकेदुखीचे प्रमाणही वाढत आहे. त्याशिवाय डिहायड्रेशनचे प्रमाणही वाढले आहे. अशावेळी नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.

गेल्या आठवड्यात खासगी व महापालिका रुग्णालयात उन्हामुळे डोकेदुखीचा जास्त त्रास झालेल्या तसेच उष्माघात सदृश त्रास जाणवणारे शेकडो रुग्ण उपचारासाठी दाखल झाले होते. त्या पार्श्वभूमीवर, वाढती डोकेदुखी आणि पित्ताच्या त्रासावर नेमकी कशी मात करावी ? याबाबत तज्ज्ञांनी काही खास टिप्स शेअर केल्या आहेत.

हवामानातील बदलामुळे डोकेदुखी, ताप, सर्दी-खोकल्याचे रुग्ण वाढले आहेत. दिवसा पडणाऱ्या कडक उन्हामुळे नागरिकांच्या शरीरातून घामाच्या धारा वाहत आहेत. तर सकाळी, रात्रीच्यावेळी गारवा जाणवत आहे.

डिहायड्रेशनमध्येही वाढ

उन्हाळ्याच्या दिवसांत भूक मंदावलेली असते. पण सुट्ट्यांचा काळ असल्याने अनेकदा बाहेरचे खाणे, फिरणे होते. अशामुळे वाढत्या उन्हाच्या त्रासासोबतच पचनाचे विकारही वाढतात. अपचन, मळमळ, पित्त, उलट्या होणे, डिहायड्रेशन (शरीरातील पाणी कमी होणे), भोवळ येणे असा त्रास अधिक वाढतो. अशावेळी दुपारी उन्हात फिरताना गॉगल वापरावेत आणि टोपी घालावी, अशा सूचना डॉक्टरांनी केल्या आहे. त्याशिवाय डिहायड्रेशनचे प्रमाणही वाढले आहे.

पाण्यामुळे शरीराचे तापमान सुरळीत होण्यास मदत होते. नाश्त्यानंतर आणि दुपारच्या जेवणाआधी गूळपाणी मिसळून प्या. यामुळे शरीरात इलेक्ट्रोलाईट्सचे प्रमाण संतुलित राहण्यास मदत होते. रात्री झोपण्यापूर्वी पायांना तूप आणि खोबरेल तेल लावावे. दुधाचे मिश्रण एकत्र करून प्यावे. दूध हे नैसर्गिकरित्या थंड स्वरूपाचे असल्याने शरीरातील उष्णता कमी करते तसेच शांत झोपण्यास मदत करते. पोटाचे विकार टाळण्यासाठी दुपारी तूपभात खावा. तांदळाची भाकर खावी. उन्हामुळे चक्कर येणे, अशक्तपणाबरोबर डोकेदुखी अशी लक्षणे जाणवतात. अशावेळी सातत्याने खडीसाखर पाणी प्यावे. लाह्यांचे पाणी प्यावे.’

- डॉ. नीलेश लोंढे, आहार तज्ज्ञ व आयुर्वेदिक तज्ज्ञ

बाहेरच्या कामांचे व्यवस्थित नियोजन करावे. मगच बाहेर जावे. उन्हातून बाहेर आल्यावर लगेच पाणी पिऊ नये. ५ ते १० मिनिटांनंतरच प्यावे. घरी व कार्यालयात फ्रीजचे थंड पाणी घेण्याचे टाळावे. त्याऐवजी नेहमी माठातील पाण्याला प्राधान्य द्यावे.’

- डॉ. विनायक पाटील, जनरल फिजिशिअन, वायसीएम रुग्णालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

Virat Kohli Video: कोहली चुकला, अन् कॅच सुटला! बुमराहसह टीम इंडियानं केलेली सेलिब्रेशनला सुरुवात, पण...

Crizac IPO: क्रिझॅक आणणार 1000 कोटींचा आयपीओ, सेबीकडे पेपर्स जमा...

'शाका लाका बूम बूम' मधील संजूची लगीनघाई; किंशुक वैद्यला लागली हळद, 'या' ठिकाणी पार पडणार लग्नसोहळा

SCROLL FOR NEXT