Pimpri-Chinchwad 
पिंपरी-चिंचवड

Video: मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले अन् चिखलात फसले! पुण्यातील ज्येष्ठ नागरिकावर ओढवला बिकट प्रसंग

मॉर्निंग वॉक दरम्यान अनेकदा अपघाताच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळं यासाठी सुरक्षित जागा निवडणं गरजेचं आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

निगडी : मॉर्निंगवॉकसाठी घराबाहेर पडल्यानंतर एक ज्येष्ठ नागरिक अचानक एका दलदलीत पडल्याची आणि तिथंच फसल्याची विचित्र घटना पिंपरी-चिंचवडमधून समोर आली आहे. संबंधित व्यक्तीला चिखलातून बाहेर काढण्यासाठी अग्मिशमनदलाला पाचारण करावं लागलं. मोठ्या प्रयत्नांनंतर अग्निशमनच्या जवानांनी या व्यक्तीला सुखरुप बाहेर काढण्यात यश मिळवलं. (Went out for morning walk and got stuck in mud terrible incident happened to a senior citizen at Pimpri Chinchwad)

सुत्रांच्या माहितीनुसार, निळकंट पाटील (वय ६५) असं पीडित ज्येष्ठ व्यक्तीचं नाव असून ते निगडी येथील आपल्या घरातून सुमारे सव्वासातच्या सुमारास मॉर्निंगवॉकसाठी घराबाहेर पडले. काही वेळातच ते निगडी प्राधिकरण येथील मूकबधिर शाळेजवळील मोकळ्या जागेत फिरत असताना तिथ असलेल्या एका दलदलीत पडले. (Marathi Tajya Batmya)

पावसाचं पाणी साचून एका खोल खड्यात ही दलदल तयार झालेली असल्यानं पोटापर्यंत ही व्यक्ती खोल चिखलात रुतून बसली. अनेकदा प्रयत्न करुनही त्यांना बाहेर पडता येत नव्हतं.

दरम्यान, याचवेळी तिथून जात असलेल्या विशाल सावळे यांनी सकाळी ७.३३ मिनिटांनी अग्निशमन दलाला या घटनेची माहिती फोनवरुन कळवली. मूकबधिर शाळा प्राधिकरण निगडी इतं एक व्यक्त दलदलीत फसल्याचं त्यांनी फोनवरुन अग्निशमनच्या अधिकाऱ्यांना सांगितलं. ही माहिती कळताच प्राधिकरण उपअग्निशमन केंद्रातील कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले. (Latest Marathi News)

सब ऑफिसर गौतम इंगवले, लिडिंग फायरमन संपत गौंड, वाहन चालक प्रदीप हिले, फायरमन काशिनाथ ठाकरे, ट्रेनी फायरमन अजय साळुंखे अशी अग्निशमन दलाची टीम घटनास्थळाकडं रवाना झाली. टीमनं घटनास्थळी पोहोचल्यावर त्यांना एक व्यक्ती दलदलीत रुतून बसल्याचं आढळून आलं.

यानंतर त्यांनी परिस्थितीचा आढावा घेत लांब शिडीच्या माध्यमातून संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचले. त्यानंतर दोर आणि सीलिंग हुकच्या साहाय्यानं त्यांनी या व्यक्तीला दलदलीतून सुखरूपपणे बाहेर काढलं आणि त्यांच्या कुटुंबियांकडं त्यांना सुपूर्द केलं, अशी माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

सोलापूर जिल्ह्यातील ११ आमदारांनी किती घेतली मते? दुसऱ्या- तिसऱ्या क्रमांकावर कोण? जाणून घ्या, जिल्ह्यातील विजयी अन्‌ दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांची मते

Amol Javle Won Raver Assembly Election 2024 Result Live: रावेर विधानसभा मतदार संघातून अमोल जावळे विजयी

SCROLL FOR NEXT