लोणावळा : सध्या कोरोनाचा (Corona)वाढता उद्रेक पाहता कोविड प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस न घेतलेल्या नागरिकांना लोणावळा, खंडाळ्यात(Lonavala Khandala) प्रवेशबंदी करण्यात आली आहे. ज्यांचा लसीचा (Corona Vaccine)एकही डोस झालेला नाही तसेच ज्यांनी लसीचा दुसऱ्या डोसची मुदत उलटूनही डोस घेतला नाही अशांचे नगरपरिषद व आरोग्य विभागाच्या (Health Department)वतीने जागीच लसीकरण करण्यात येत आहे.कोरोनाचा धोका पुन्हा वाढत आहे. यापार्श्वभूमीवर लोणावळा, खंडाळ्यासह मावळ तालुक्यातील पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी बंद करण्यात आली आहे.
पर्यटकांना येथील पर्यटनस्थळांवर मज्जाव करण्यात येत आहे. कोविड प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस न घेतलेल्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. लोणावळा नगरपरिषद, शहर पोलिसांच्या वतीने खंडाळा व वळवण येथील सेंटर पॉइंट येथे चेकपॉइंट लावण्यात आले असून लसीचे दोन्ही डोस न घेतलेल्या नागरिकांना शहरात प्रवेश करतानाच रोखले जात आहे. दरम्यान कोरोना संसर्गाची भिती अद्यापही कायम आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने लोणावळा ते अॅंम्बी व्हॅली रस्त्यावर भुशी व लायन्स पाॅइंटकडे जाणारी वाहने नौसेना बाग, रायवूड येथे पोलिसांच्या वतीने रोखण्यात येत आहेत. राज्यात १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण, १८ वर्षावरील सर्वांना लसीचा पहिला व दुसरा डोस तर फ्रंटलाईन वर्कर व ज्यांना दुसरा डोस घेऊन नऊ महिन्यांचा कालावधी पुर्ण झाला आहे त्यांच्याकरिता बुस्टर डोस दिला जात आहे.(Pune corona Update)
लसीकरणासाठी नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे, मात्र ज्यांनी अद्याप एकही डोस घेतला नाही व दुसऱ्या डोस मुदत उलटून गेल्यानंतरही डोस घेतला नाही अशा नागरिकांचे जाग्यावर लसीकरण करण्यात येत असल्याचे मुख्याधिकारी सोमनाथ जाधव म्हणाले. इतरांना शहरात प्रवेश नाकारण्यात येत असल्याचे जाधव म्हणाले.कोरोनाची साथ अजून आटोक्यात आलेली नसून पुण्यामंबईहून मोठ्या संख्येने पर्यटक लोणावळ्यात येत असतात विनाकारण गर्दी टाळण्यासाठी सध्या कारवाई करण्यात येत असल्याचे पोलीस निरीक्षक सीताराम डुबल म्हणाले.
नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण
लोणावळा,खंडाळा ही प्रसिद्ध पर्यटनस्थळे आहेत. पुण्या-मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाण असल्याने याठिकाणी ये-जा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. नोकरदार,व्यावसायिक, विदयार्थी यांचा यामध्ये भरणा आहे. विद्यार्थ्यांसाठीही नुकतेच लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. असे असताना ज्यांनी लसीची एक मात्रा घेतली आहे तसेच दुसऱ्या डोससाठीचा अठ्ठावीस व चौऱ्याऐंशी दिवसांचा कार्यकाळ पूर्ण होण्यास अवधी आहे अशा नागरिकांमध्ये मात्र यामुळे गोंधळाचे वातावरण आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.