पिंपरी-चिंचवड

कामशेत ग्रामपंचायतीवर महिलांचा मोर्चा

CD

कामशेत, ता.१ : कामशेतमधील इंद्रायणी कॉलनीमध्ये मागील पाच दिवसांपासून पाणीपुरवठा झाला नाही. त्यामुळे, स्थानिक महिलांनी आक्रमक भूमिका घेत शुक्रवारी (ता.३१) ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला. तसेच याप्रकरणी प्रशासनाला जाब विचारला. या भागात तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली.
गेल्या चार महिन्यांपासून कामशेत शहरात नागरिकांना पाण्यासाठी सतत वणवण करावी लागत आहे. मात्र, ग्रामपंचायतीकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. इंद्रायणी कॉलनीमध्ये मागील पाच दिवसांपासून पाणीपुरवठा झाला नाही. त्यावर स्थानिक महिलांनी आक्रमक भूमिका घेत कामशेत ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला. सरपंच रूपेश गायकवाड, उपसरपंच अनिता गायखे, ग्रामसेवक संतोष शिंदे व इतर सदस्यांशी पाणी प्रश्नाबाबत चर्चा केली. तसेच ग्रामपंचायत प्रशासनाला जाब विचारला. मात्र, त्यावर प्रशासनाकडून विविध कारणे देण्यात आली. त्यामुळे, महिलांनी नाराजी व्यक्त केली. मात्र, समस्येवर कोणताच तोडगा निघाला नाही. त्यामुळे, याबाबत लोकप्रतिनिधींनी तत्काळ लक्ष देऊन प्रश्न सोडवावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

पाणी कमी दाबाने येत आहे. कधी कधी पाणी दोन-दोन दिवस येत नाही. त्यामुळे, आम्ही ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला. ग्रामपंचायत प्रशासनाने आम्हाला पुरेसे पाणी पुरवावे.
- बबिता मोहिते, स्थानिक रहिवासी, इंद्रायणी कॉलनी

गेल्या अनेक दिवसांपासून पाणीपुरवठा सुरळीत नाही. ग्रामपंचायत प्रशासनाला वारंवार विचारणा करून सुद्धा आमच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. कर्मचाऱ्यांना सांगितले; तर कर्मचारी आम्हाला उडवाउडवीची उत्तरे देतात. आमचा पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा.
- सुनंदा लोखंडे, स्थानिक रहिवासी, इंद्रायणी कॉलनी

ग्रामपंचायत आणि प्रशासन यांच्या बेजबाबदारपणामुळे नागरिकांना भर उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. नागरिकांना पाणी उपलब्ध करून देणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे.
- गणपत शिंदे, सदस्य, ग्रामपंचायत, कामशेत
PNE24U23322

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT