Xerox Business Sakal
पिंपरी-चिंचवड

झेरॉक्स व्यवसाय अडचणीत; पेपर, टोनर, वीजबिलात वाढ

झेरॉक्ससाठी लागणारा कागद, टोनर यांच्या किमतीत वाढ झाल्यामुळे झेरॉक्स व्यवसाय डबघाईस आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

झेरॉक्ससाठी लागणारा कागद, टोनर यांच्या किमतीत वाढ झाल्यामुळे झेरॉक्स व्यवसाय डबघाईस आला आहे.

पिंपरी - झेरॉक्ससाठी लागणारा कागद, टोनर यांच्या किमतीत वाढ झाल्यामुळे झेरॉक्स व्यवसाय डबघाईस आला आहे. गेल्या तीन वर्षांत कागद, वीजबिल, मेंटेनन्स आणि इतर खर्च वाढल्याने जम्बो झेरॉक्स व्यावसायिक अडचणीत आले आहेत. परिणामी, खर्च झेपत नसल्याने अखेर झेरॉक्सच्या दरात मोठी वाढ झाली आहे

शहरात लहान ८ हजार किरकोळ झेरॉक्स व्यावसायिक आहेत तर १६० जम्बो झेरॉक्स दुकाने आहेत. न्यायालय, पुरवठा कार्यालये, अप्पर तहसील, भूमापन, महापालिका, बँका असे मोठे जाळे असल्याने झेरॉक्सला मागणी आहे. इंधन दरवाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. झेरॉक्स व्यवसायासाठी लागणारा पेपर, टोनर (शाई) यांच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. व्यवसायातील प्रचंड स्पर्धेमुळे ग्राहकांना झेरॉक्स अल्पशा दरात दिली जाते. त्यामुळे झेरॉक्स व्यावसायिकांना तोटा सहन करावा लागतो. गेल्या वीस वर्षांपासून झेरॉक्सचे दर कायम आहेत. पूर्वी जास्त प्रती काढल्यास ५० पैसे कॉपी, तर प्रतिकॉपी पाठपोट १ रुपया असा दर होता. एका दुकानात प्रत्येक दिवशी एक हजार झेरॉक्स कॉपी काढण्यात येतात.

देखभालीसाठी वर्षाला १६ हजार

सर्व्हिस चार्ज, कर, इंटरनेट देखभाल याचाही ताण आहे. झेरॉक्स मशिनच्या किमती लाखात आहेत. झेरॉक्स मशिनच्या देखभालीसाठी वर्षाला जवळपास १६ हजार रुपये खर्च येतो. दोन वर्षांपूर्वी ८ हजार रुपये मागणारे कामगार आता १२ हजार रुपयांची मागणी करीत आहेत. दुकानांच्या भाड्यातही वाढ झाली आहे. दुकानदारांनी जोडधंदा सुरू केला आहे. स्कॅनिंग, फॅक्स, लॅमिनेशन, डिझायनिंग, डीटीपी आणि प्रिंटिंगच्या कामातून ते पैसे मिळवत आहेत. झेरॉक्स व्यवसायातील खर्च दीडपट-दुप्पट वाढला आहे. मात्र, झेरॉक्स कॉपीचे दर मात्र जैसे थे आहेत. जम्बो झेरॉक्स दुकानात सध्या १ ते १०० कॉपी काढल्यास १ रुपया तर १०० पेक्षा अधिक कॉपीजसाठी ७५ पैसे आकारण्यात येत आहे. तर किरकोळ दुकानात प्रतीकॉपी १ रुपया, तर पाठपोट २ रुपये घेतात. अशा परिस्थितीतून झेरॉक्सचा व्यवसाय शहरात सुरू आहे. त्यामुळे स्वयंरोजगार व उदरनिर्वाहाचे साधन असलेली अनेक कुटुंबे आर्थिक अडचणीत आली आहेत.

विद्यार्थ्यांना दरवाढीचा फटका

महाविद्यालयात आता पूर्वीप्रमाणे नोट्स लिहून दिल्या जात नाहीत. तर नोट्स एखाद्या झेरॉक्स सेंटरवर उपलब्ध करून दिल्या जातात. १०० ते २०० पेजेसच्या झेरॉक्स एका विद्यार्थ्याला काढाव्या लागतात. मात्र झेरॉक्सच्या वाढत्या दरामुळे विद्यार्थ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. पूर्वी एक रुपयात मिळणारे झेरॉक्स आता तीन ते चार रुपयांपर्यंत पोहोचले आहे. नवीन पुस्तकाचे दर विद्यार्थ्यांना परवडत नाहीत. विद्यार्थी त्यातील नोट्स झेरॉक्स करतात. मात्र, ही दरवाढ विद्यार्थ्यांना त्रासदायक ठरत आहे.

कागदाच्या दरात वाढ

कागदाच्या रिमची किंमत १४८ ते १५० रुपये आहे. एका रिममध्ये ५०० कागद असून, एक कागद ५६ पैशास पडतो. लाइट, टोनर आणि इतर खर्चाचा विचार करता एका प्रतीसाठी ५२ ते ५५ पैसे खर्च येतो. ५० पैशात प्रत कशी द्यायची, असा सवाल झेरॉक्स किरकोळ व्यावसायिकांनी केला आहे. डिझेलवरील जनरेटरचा वापर करून ५० पैसे किंवा एक रुपयात प्रिंट देणे परवडत नसल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.

दिवसेंदिवस महाराष्ट्रात कागद, पुठ्ठा, पेपर यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि पुरवठा कमी प्रमाणात होत आहे. याचाच फटका झेरॉक्स विक्रेत्यांना होत आहे. झेरॉक्स मशिनला लागणारे स्पेअरपार्टस यांच्या दरातही मोठी वाढ झाली आहे आणि दुकानाची होत असलेली भाडेवाढ या कारणामुळे झेरॉक्स होलसेल व रिटेल किरकोळ विक्रेते त्रस्त आहेत.

- अरविंद बारसकर, जम्बो झेरॉक्स विक्रेता, पिंपळे गुरव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघात कोणी घेतली आघाडी ? भाजप विरुद्ध शरद पवार गटात थेट लढत

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळमध्ये सुनील शेळके यांची दणदणीत आघाडी

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT