sharad pawar  Esakal
Politics | राजकारण

Sharad Pawar : इकडे आयोगासमोर सुनावणी तर तिकडे पवारांनी घेतली काँग्रेस अध्यक्षांची भेट ; राहुल गांधीही होते उपस्थित

शरद पवार: On one hand hearing before the commission and on the other hand met the Congress president...

सकाळ डिजिटल टीम

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी दिल्ली येथे भेट दिली. यावेळी काँगेस नेते खासदार राहुल गांधी, आमदार जितेंद्र आव्हाड, गुरुदीप सपाल उपस्थित होते.

दिल्लीमध्ये राष्ट्रवादी कोणाची? या विषयावर आज निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार आहे. अशावेळी या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. मात्र स्वतः शरद पवार यांनी आज खर्गे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी नक्की कोणत्या बाबींवर चर्चा झाली हे अजून स्पष्ट झालेले नाही.

स्वतः शरद पवार यांनी याविषयीची माहिती ट्विटर द्वारे दिली या ते म्हणाले आहेत की काँग्रेस अध्यक्ष खासदार मल्लिकार्जुन खर्गे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन शिष्टाचार भेट घेण्यात आली. या बैठकीला खासदार राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड व इतर नेते उपस्थित होते.

येत्या काळात पाच राज्याच्या विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. याचबरोबर इंडिया आघाडीत नक्की काय होतंय याकडेही संपूर्ण देशाचे लक्ष आहे. अशावेळी या भेटीमध्ये या सर्व महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाली असू शकते असे म्हटले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : लोकसभेला गंमत केली आता गंमत केली तर...; अजित पवार थेटच बोलले

Paithan Vidhan Sabha: संदीपान भुमरेंच्या मुलावर प्रचार थांबवण्याची वेळ; डॉक्टरांनी सांगितलं कारण

Latest Maharashtra News Updates live : येवल्यात मनोज जरांगेंचं जंगी स्वागत

ouchhh...! भारताला मोठा धक्का, Shubman Gill ला सराव सामन्यात दुखापत, पर्थ कसोटीला मुकण्याची शक्यता

Green Plants : हिवाळ्यात घरातील हवा राहील ताजी, या ४ हिरव्या झाडांनी हवा होईल शुद्ध

SCROLL FOR NEXT