kbc 16 winner esakal
Premier

कमाल! २२ वर्षाचा तरुण ठरला KBC 16 चा पहिला करोडपती; जिंकलेल्या पैशाचं काय करणार? म्हणाला-

KBC 16 First Winner Of 1 Crore: 'केबीसी'ला या सीझनमधील पहिला करोडपती मिळाला आहे. 22 वर्षीय UPSP उमेदवार चंदर प्रकाश हा मूळचा जम्मू-काश्मीरचा आहे.

Payal Naik

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम 'कौन बनेगा करोडपती' मध्ये जाण्यासाठी प्रेक्षक आतुर असतात. आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर हे जग जिंकण्याची इच्छा आणि विश्वास असलेले अनेक स्पर्धक या कार्यक्रमात सहभागी होतात. केवळ आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर हा खेळ जिंकून अनेक स्पर्धक इथून लाखो रुपये जिंकून गेले आहेत. आता या कार्यक्रमाचा १६ वा सीझन सुरू आहे आणि या सीझनला त्याचा पहिला करोडपती विजेता भेटला आहे. एक २२ वर्षाचा युपीएसी अस्पिरंट या सीझनचा पहिला विजेता ठरला आहे. महत्वाचं म्हणजे त्याने ७ कोटींच्या प्रश्नाचं देखील उत्तर योग्य दिलं होतं मात्र त्याआधीच त्याने खेळ सोडला असल्याने तो १ कोटी रुपयेच जिंकू शकला.

काय होता १ कोटीचा प्रश्न?

जम्मू काश्मीरचा २२ वर्षांचा युपीएससीची तयारी करणारा तरुण चंदर प्रकाश याने सगळ्या प्रश्नांची योग्य उत्तरं देत १ कोटींची रक्कम जिंकली आहे. ही रक्कम जिंकल्यानंतर अमिताभ यांनी त्याला घट्ट मिठी मारली. चंदरला १ कोटी रुपयांसाठी विचारण्यात आलेला प्रश्न होता, कोणत्या देशाचं सगळ्यात मोठं शहर त्याची राजधानी नाहीये , तर एक बंदर आहे. या बंदराचं नाव अरबी आहे ज्याचा अर्थ शांतीचा निवास असणं असा आहे. या प्रश्नाचं उत्तर देताना चंदर ने दोन लाइफ लाइनचा उपयोग केला. त्यानंतर त्याने योग्य उत्तर दिलं तंजानिया आणि तो या सीझनचा पहिला करोडपती ठरला.

जिंकलेल्या पैशांचं काय करणार?

चंदरला जेव्हा त्याच्या जिंकलेल्या पैशांबद्दल विचारन्यत आलं तेव्हा तो म्हणाला, 'मी जेव्हा जन्माला आलो तेव्हापासून माझ्या आतड्यांमध्ये काहीतरी समस्या आहे. माझ्यावर आतापर्यंत सात सर्जरी झाल्या आहेत. अजूनही ती समस्या आहे आणि डॉक्टरांनी आठवी सर्जरी करायला सांगितली आहे. त्यामुळे माझ्या आईवडिलांनी माझ्यावर खूप खर्च केलाय. ही जिंकलेली रक्कम मी त्यांना उपचारासाठी देणार आहे. त्याच्या या उत्तराचं देखील तिथे उपस्थित प्रेक्षकांनी कौतुक केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: '...तर उद्धव येतोच कसा आडवा?', भोंग्यांवरून राज ठाकरेंनी सुनावलं, नेमकं काय म्हणाले?

Biotech IPO : 'ही' बायोटेक कंपनी आणणार 600 कोटीचा आयपीओ,अधिक जाणून घेऊयात...

Fact Check : इस्लामिक झेंडे फडकवत निघालेली बाईक रॅली अकोल्यातील काॅंग्रेस उमेदवाराच्या प्रचाराची नाही, व्हायरल दावा खोटा

'मुश्रीफ खूप प्रामाणिक नेता, त्यांना कोणतेही लेबल लावू नका'; शरद पवारांना उद्देशून काय म्हणाले प्रफुल्ल पटेल?

Aditya Thackeray : महाविकास आघाडी जिंकली नाही तर गुजरात जिंकेल; आदित्य ठाकरेंचा घणाघात

SCROLL FOR NEXT