Ayres Sasaki Esakal
Premier

Ayres Sasaki : लोकप्रिय गायकाचा कॉन्सर्टदरम्यान भयंकर मृत्यू; भिजलेल्या चाहत्याच्या मिठीमुळे स्टेजवरच गमावला जीव

सकाळ डिजिटल टीम

Brazil : सुप्रसिद्ध ब्राझिलियन गायक आयरेस सासकी यांचं वयाच्या ३५ व्या वर्षी अचानक निधन झालं. त्यांच्या निधनाने चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला. अतिशय वेदनादायक त्यांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांना धक्का बसला आहे. ही घटना घडली तेव्हा आयरेस यांचा सॅलिनोपोलिसमधील सोलर हॉटेलमध्ये त्यांचा कॉन्सर्ट होता. त्यांचं नुकतंच लग्न झालं आणि त्यांच्या लग्नाला एक वर्षंही पूर्ण झालं नव्हतं. या घटनेमुळे त्यांच्या पत्नीला खूप मोठा धक्का बसला असून ती शोकाकुल अवस्थेत आहे.

'द मिरर'ने दिलेल्या वृत्तानुसार, आयरेस सासाकीची मावशीही या कॉन्सर्टला ही घटना घडली तेव्हा हजर होती. तिथे जे काही घडलं याचा त्यांनाही खूप मोठा धक्का बसला असून त्या या घटनेमुळे खूप अस्वस्थ झाल्या आहेत. 'आम्हाला एवढंच माहीत आहे की त्याचा शो एका विशिष्ट वेळेला नियोजित करण्यात आला होता पण नंतर त्याची वेळ बदलण्यात आली. पण काय घडलं हे समजून घेण्यासाठी आम्ही त्या वेळी त्याच्यासोबत असलेल्या लोकांशी संपर्क साधत आहोत. सर्व माहिती गोळा केल्यानंतर आम्ही एक प्रेस स्टेटमेंट जारी करू." असं त्यांनी म्हंटलं.

भिजलेल्या फॅनची मिठी ठरली मृत्यूचं कारण

आयरेस यांचा परफॉर्मन्स सुरु असताना आयरेस यांचा एक भिजलेला फॅन त्यांना भेटायला स्टेजवर आला. तो जसा आयरेस यांना मिठी मारण्यासाठी पुढे आला तसा बाजूने जाणाऱ्या केबलमधून विजेचा झटका त्या दोघांना बसला आणि आयरेस यांचा जागीच मृत्यू झाला. पण हा भिजलेला चाहता स्टेजवर कसा पोहोचला ? यामागे काय कारण आहे याचा पोलीस तपास करत आहेत.

आयरेस यांनी त्यांची शेवटची सोशल मीडिया पोस्ट डिसेंबर २०२३ मध्ये पोस्ट केली होती. अनेकजण या पोस्टवर कमेंट करून आयरेस यांना श्रद्धांजली वाहत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप नेत्यानं धमकी दिली ‘वर्दी उतरवा देंगे...’, जिगरबाज ASI नं स्वत:च वर्दी काढली अन्...; फिल्मीस्टाईल Video Viral

Rahul Gandhi: राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख देणार; मुख्यमंत्री शिंदेंचा आमदार बरळला

SIM Card Rules : दूरसंचार विभागाने लागू केले सिम कार्ड खरेदीचे नवे नियम; लगेच करून घ्या ई-KYC, सोपी प्रोसेस एका क्लिकमध्ये..

'कोल्हापूर-पुणे वंदे भारत'चे वेळापत्रक जारी; कशी करता येईल Online Booking, कुठे असणार थांबा? जाणून घ्या..

Aditi -Siddharth Wedding : प्रेम जे कधीच संपणार नाही...अखेर अदिती -सिध्दार्थने बांधली लग्नगाठ ; साध्या पद्धतीत पार पडला विवाहाचा थाट

SCROLL FOR NEXT